प्रशासक न्यूज,दि.१६नोव्हेंबर
चारचाकी गाडीत ड्रायव्हर सीटवर ठेवलेली २,३१,०००रुपयांची रोकड भरदिवसा लंपास केल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी या गावात काल दि.१५ मंगळवार रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे सदर चोरीबाबत विजय नारायण चौधरी यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी विजय चौधरी हे साई टायर्स यांना ट्रकच्या टायरचे पैसे देण्यासाठी २,३१,०००रुपये रोख रक्कम एका पांढऱ्या कापडी पिशवीत ठेवुन त्यांच्या चारचाकी गाडीतून जात असताना काष्टी शिवारात नगर दौंड रस्त्यावर हॉटेल जयश्री जवळ त्यांच्या मारुती सुझुकी सियाज गाडी क्र एम एच१२ एलव्ही ९२७०मधून ड्रायव्हर सीटच्या डाव्या बाजूचा दरवाजा उघडून त्या सीटवर सदर रोकड ठेवलेली पिशवी अज्ञात चोरट्याने चोरून नेली पिशवीसह रोकड चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर चौधरी यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला धाव घेत तक्रार दाखल केली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग हे करत आहेत
परंतु भरदिवसा गाडीतून अशी रोकड लंपास झाल्याच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे
भरदिवसा लाखोंची रोकड पळवली,श्रीगोंदा तालुक्याच्या या भागातील घटना
Reviewed by Prashasak
on
नोव्हेंबर १६, २०२२
Rating:
Reviewed by Prashasak
on
नोव्हेंबर १६, २०२२
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: