प्रशासक न्यूज,दि.१४नोव्हेंबर
रिफ्लेकटर नसलेला ऊस वाहतूक करणारा ट्रॅकटर रात्रीच्या वेळी दिसून न आल्यामुळे धडक होऊन झालेल्या अपघातात काष्टी येथील तीन तरुणांना काल रात्री आपला जीव गमवावा लागला होता या दुर्दैवी घटनेनंतर सोशल मीडियावर सर्वच स्तरातून अश्या विना रिफ्लेकटर ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई करण्याची जोरदार मागणी झाली तसेच अश्या वाहनांवर कारवाई होत नसल्यामुळे व निष्पाप लोकांचे जीव जात असल्यामुळे संताप व्यक्त करण्यात आला
त्यानंतर श्रीगोंदा तहसीलदारांनी आज तालुक्यातील चारही साखर कारखान्यांच्या चेअरमनशी पत्रव्यवहार करत ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडी,ट्रॅकटर,ट्रक अश्या या सर्व वाहनांना रिफ्लेकटर बसवण्यासह मोटार वाहन कायद्याअंतर्गत सर्व बाबींची पूर्तता करण्याबाबत सूचना केल्या आहेत तसेच सदर सूचनांचे कारखान्यांनी पालन न केल्यास उदभवणाऱ्या परिस्थतीला कारखाने जबाबदार असतील असा कडक इशारा तहलसीलदारांनी कारखान्याना दिला आहे
चौकट/-कारखानदारांसह,आरटीओ,पोलीसांनी देखील गंभीर दखल घेणे जरुरी
कारखाने सुरू झाले की दरवर्षी विना रिफ्लेकटर वाहनांना धडकून अनेकांना आपला हकनाक जीव गमवावा लागतो तरीसुद्धा त्या विषयाकडे कुणी फारसे गांभीर्याने पाहत नाही परंतु आतातरी सर्व कारखान्यांनी अश्या विना रिफ्लेकटर ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांबाबत कठोर भूमिका घेणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे इतर वेळी सामान्य वाहनचालकांना नियमांच्या नावाखाली त्रास देणाऱ्या आरटीओ विभागाने सुद्धा आता अश्या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारने जरुरी आहे पोलिसांनी सुद्धा त्यांच्या कार्यक्षेत्रातील अश्या वाहनावर कायमस्वरूपी जरब बसेल अशी ठोस कारवाई करणे गरजेचे आहे
चौकट/- नियम धाब्यावर बसवून ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांबाबत काष्टी ग्रामपंचायत आक्रमक
काष्टी गावातील तरुणांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर काष्टी ग्रामपंचायत अश्या नियम धाब्यावर बसवून ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनाबाबत चांगलीच आक्रमक झाली असून विना रिफ्लेकटर तसेच मोठ्या आवाजात टेप लावुन ऊस वाहतूक करणारी वाहने काष्टी ग्रामपंचायत हद्दीतून जाताना दिसल्यास त्यांना चोप देऊन चांगली समज देणार असल्याचे मयसेजच आज सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे
तीन तरुणांचा बळी गेल्यानंतर अखेर प्रशासनाला जाग,तहसीलदारांच्या कारखान्याच्या अध्यक्षांना सूचना!
Reviewed by Prashasak
on
नोव्हेंबर १४, २०२२
Rating:
Reviewed by Prashasak
on
नोव्हेंबर १४, २०२२
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: