प्रशासक न्यूज,दि.१४नोव्हेंबर
काष्टी गावातील तीन तरुणांचा काल दि.१३रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास दौंड पाटस रस्त्यावर वायरलेस फाट्यानजीक उसाच्या ट्रॅकटरला धडकून झालेल्या अपघातात मृत्यू झाला आहे
ऋषिकेश महादेव मोरे (वय २६ )स्वप्निल सतिष मनुचार्य (वय२४),गणेश बापु शिंदे (वय २५) अशी अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत हे तिन्ही तरुण काष्टी गावातील बाजारतळ परिसरात राहत होते या घटनेमुळे संपूर्ण काष्टी गावावर शोककळा पसरली असून गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे प्राथमिक माहिती समजली आहे
प्राथमिक समजलेली माहिती अशी की मयत झालेले तिन्ही तरुण काल रात्री दुचाकीवरून जात असताना समोर चाललेल्या उसाच्या ट्रॅकटर ला धडकले यात त्यांचा मृत्यू झाला या अपघातामुळे पुन्हा एकदा विना रिफ्लेकटर ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनावर कडक कारवाईचा मुद्दा समोर आला आहे
प्रशासन व कारखानदारांना कधी जाग येणार?
विना रिफ्लेकटर ऊस वाहतूक करणारी वाहने रात्रीच्या वेळी अंधारात प्रवास करताना दिसून येत नाहीत त्यामुळे अश्याया प्रकारे अपघात होऊन आतापर्यत तालुक्यातही अनेक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे काही दिवसांपूर्वीच श्रीगोंदा शहरातील तीन तरुणांचा असाच अपघात होऊन मृत्यू झाला होता त्यामुळे आतातरी प्रशासन व कारखानदार यांनी अजिं निष्पाप लोकांचे जीव जाण्याची वाट पहात न बसता या विनारिफ्लेकटर प्रवास करणाऱ्या वाहनांबाबत कडक कठोर भूमिका घेणे गरजेचे आहे
काष्टी गावावर शोककळा;अपघातात तीन तरुणांचा मृत्यू
Reviewed by Prashasak
on
नोव्हेंबर १३, २०२२
Rating:
Reviewed by Prashasak
on
नोव्हेंबर १३, २०२२
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: