नेते,कार्यकर्त्यांचा होतोय मोठेपणा--जनता मात्र झाली हैराण!


प्रशासक न्यूज,दि.१२नोव्हेंबर

प्रसंग कोणताही असो राजकीय नेता असेल अथवा त्याचे कार्यकर्ते यांना मोठेपणा हवा असतो त्यात एखाद्याच लग्न,वाढदिवस अस शुभकार्य असो वा एखाद्या व्यक्तीचा अंत्यविधी,दशक्रियाविधी,वर्षश्राद्ध असा दुःखाचा प्रसंग त्याप्रसंगी शुभेच्छा,शुभाशीर्वाद,श्रद्धांजली देण्यासाठी नुसती झुंबड असते

श्रीगोंदा तालुक्यातील याच प्रथेला जनता आता पुरती वैतागली आहे तालुक्यात सुखाची वा दुःखाची कोणतीही घटना घडली तरी शुभेच्छा,श्रद्धांजली प्रसंगी त्याठिकाणी होणारी लोकांची भाषणे याला लोक आता पुरते वैतागून गेले आहेत त्यामुळे ही प्रथा इतिहास जमा करण्याची मागणी लोक करत आहेत

अनेकदा लग्नप्रसंगी नवरा नवरी स्टेजवर लग्नमुहूर्ताच्या वेळेवर जाऊन उभे राहतात पण लग्नांमध्ये शुभेच्छा,शुभाशीर्वाद देणाऱ्यांची संख्या इतकी मोठी असते की लग्न एक एक तास उशिरा लागतात अनेकदा तर आपला नेता यायला उशीर होतोय म्हणून हजारो लोकांना वेठीस धरून जाणीवपूर्वक त्या नेत्याच्या मनोगतासाठी काही कार्यक्रमास तास तासभर उशीर करतात त्यामुळे आपला बहुमोल वेळ खर्च करून लग्नाला आलेले लोक बसून बसून हैराण होतात
हे झालं लग्नाचं पण एखादी व्यक्ती मयत झाल्यानंतर त्याच्या अंत्यविधी प्रसंगी सुद्धा श्रद्धांजली देणाऱ्यांची मोठी रीघ असते त्यामुळे या श्रद्धांजली देणाऱ्यांमुळे अंत्यविधी सुद्धा लांबतो

काही बोलणाऱ्या लोकांना तर आपण कोणत्या प्रसंगी बोलत आहोत थोडक्यात शुभेच्छा,श्रद्धांजली द्यावेत याचे भानच राहत नाही ते थेट माईक हातात आल्यावर भाषण केल्यासारखच बोलायला लागतात तसेच काही राजकीय नेते तर अश्या प्रसंगी बोलताना राजकीय भाषणच करतात वेळेचं भान त्यांना राहत नाही त्यामुळे कार्यक्रमाला आलेल्या लोकांची चांगलीच तारांबळ होते

चौकट-बोलायला संधी न दिल्यास नाराजगी
अलिकडे कार्यकर्ता लहान असो वा मोठा त्याला मोठेपणा हवा असतो,माईकवर बोलण्याची संधी हवी असते कार्यक्रमाला जमलेल्या गर्दीपुढे आपला मोठेपणा व्हावा अशी अपेक्षा त्यांना असते सुख दुखाच्या प्रसंगी त्याला माईक नाही मिळाला तर कार्यक्रम झाल्यावर आयोजकाला नाराजगीचा सामना करावा लागतो

चौकट-प्रातिनिधिक स्वरूपात शुभेच्छा,श्रद्धांजली असावी
कार्यक्रम प्रसंगी विविध क्षेत्रातील अगदी मोजक्या लोकांना अगदी थोडक्यात आपली श्रद्धांजली शुभेच्छा व्यक्त करण्यास सांगण्यात यावे जेणेकरून आलेल्या उपस्थित लोकांचा विनाकारण वाया जाणारा वेळ वाचेल

चौकट-कार्यकर्ते,मान्यवर व्यक्ती,नेते यांनी मनाचा मोठेपणा दाखवणे गरजेचे
श्रीगोंदा तालुक्यात सुरू असलेली ही प्रथा बंद करण्यासाठी तालुक्यातील सर्वच राजकीय नेते,कार्यकर्ते वा अश्या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित असणारे विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी आपल्या मनाचा मोठेपणा दाखवत ही प्रथा बंद करण्यासाठी स्वतःहून च पुढाकार घेत लोकांचा वाया जाणार वेळ वाचवणे गरजेचे आहे

एकूणच काय तर मोजक्या नेत्यांची,कार्यकर्त्यांची,मान्यवर
व्यक्तींची मनधरणी करण्याच्या नादात विविध कार्यक्रमांमध्ये सामान्य जनता विनाकारण वेठीस धरली जात आहे त्यामुळे या कष्टदायी प्रथेला तिलांजली देण्याची मागणी आता तालुक्यातील लोक करत आहेत
नेते,कार्यकर्त्यांचा होतोय मोठेपणा--जनता मात्र झाली हैराण!   नेते,कार्यकर्त्यांचा होतोय मोठेपणा--जनता मात्र झाली हैराण! Reviewed by Prashasak on नोव्हेंबर १२, २०२२ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.