'त्या' प्रकरणी आता चौकशी अधिकाऱ्यांची नियुक्ती!


प्रशासक न्यूज,दि.११नोव्हेंबर

श्रीगोंदा नगराध्यक्षा शुभांगी पोटे या विश्वासात घेत नसून मनमानी कारभार करत आहेत तसेच त्यांच्या कार्यकाळात श्रीगोंदा नगरपरिषदेत मोठा गैरकारभार झाल्याचा आरोप करत त्यांना पदावरून हटवण्याबाबत त्यांच्याविरोधात काँग्रेस व भाजपच्या एकूण १६नगरसेवकांनी एकत्रित येऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास ठराव दाखल केला होता त्यावर आता पुढील प्रक्रिया सुरू झाली आहे
नगरसेवकांनी दाखल केलेल्या अर्जाच्या अनुषंगाने अ नगर जिल्हाधिकाऱ्यांनी नगरपरिषद विभागाचे सहआयुक्त प्रशांत खांडकेकर यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली असून त्यांना या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून २५ नोव्हेंबर पर्यत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत
येत्या सोमवारी दि.१४नोव्हेंबर रोजी श्रीगोंदा नगरपरिषदेत ही चौकशी होणार आहे यात नगराध्यक्षा शुभांगी पोटे यांना त्यांच्यावरील आरोपांबाबत तसेच अविश्वास ठरावाबाबत लेखी व तोंडी म्हणणे सादर करण्यास सांगण्यात आले आहे यावेळी आरोप करणाऱ्या १६ नगरसेवकांचे देखील लेखी,तोंडी म्हणणे चौकशी अधिकारी ऐकून घेणार आहेत दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेऊन त्याबाबतचा अहवाल चौकशी अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करणार आहेत
त्यामुळे आता पुढील घडामोडी काय घडणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे
'त्या' प्रकरणी आता चौकशी अधिकाऱ्यांची नियुक्ती! 'त्या' प्रकरणी आता चौकशी अधिकाऱ्यांची नियुक्ती! Reviewed by Prashasak on नोव्हेंबर ११, २०२२ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.