प्रशासक न्यूज,दि.७नोव्हेंबर
श्रीगोंदा नगरपरिषदेचे नगरसेवक मनोहर पोटे व त्यांच्या पत्नी नगराध्यक्षा शुभांगी पोटे यांच्या अपात्रतेवर आज मुंबईत मुख्यमंत्र्यांसमोर सुनावणी झाली यावेळी तक्रारदार संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष टिळक भोस,शहराध्यक्ष सतीश बोरुडे,मनोहर पोटे,श्रीगोंदा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी ढोरजकर,नगरपरिषद सहआयुक्त प्रशांत खांडकेकर उपस्थित होते
भोस यांच्यावतीने ऍड पाटील यांनी तर पोटे यांच्या बाजूने ऍड फडणीस यांनी मुख्यमंत्र्यांसमोर बाजू मांडली यावेळी पोटे यांचे वकीलांनी ही अपात्रतेची तक्रार नगरसेवकांनी करणे आवश्यक असल्याचे सांगितले त्यावर भोस यांचे वकील पाटील यांनी तक्रारदार असलेले टिळक भोस हे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली श्रीगोंदा नगरपरिषदेत काही उमेदवारांनी निवडणूक लढवली तसेच सतिष बोरुडे हे स्वतः मनोहर पोटे यांचे मतदान प्रतिनिधी होते त्याबाबतचे ओळखपत्र त्यांच्याकडे आहे त्यामुळे तक्रारदार दोघेही निवडणूक प्रक्रियेत सहभागी असल्यामुळे त्यांना तसेच मतदार करणाऱ्या नागरिकांना देखील अश्याप्रकारे तक्रार करण्याचा अधिकार असल्याचे मत मांडले
तसेच सदर तक्रारीबाबत पोटे यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती त्यावर न्यायालयाने दिलेली ऑर्डर त्यांच्या वकिलांनी यावेळी दाखवली त्यावर टिळक भोस व बोरुडे यांना या ऑर्डर वर तीन दिवसात लेखी म्हणणे मांडण्यास सांगण्यात आले आहे
दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी लवकरच अंतिम निर्णय देणार असल्याचे सांगितले त्यामुळे आता पोटेंच्या राजकीय भवितव्याबाबत काय निर्णय होणार याबाबत सगळीकडे चर्चा असून सर्वानाच त्या निर्णयाची उत्सुकता लागली आहे
आता मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष
Reviewed by Prashasak
on
नोव्हेंबर ०७, २०२२
Rating:
Reviewed by Prashasak
on
नोव्हेंबर ०७, २०२२
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: