श्रीगोंदा नगरपरिषदेच्या राजकारणात भूकंप


प्रशासक न्यूज,दि.४नोव्हेंबर

श्रीगोंदा नगराध्यक्षा शुभांगी पोटे यांच्या विराधात आज त्यांना पदावरून हटवण्याबाबत अर्ज दाखल करण्यात आला विशेष म्हणजे थेट जनतेतुन निवडून आलेल्या नगराध्यक्षांविरोधात अश्या प्रकारे अविश्वास दाखल होण्याची ही राज्यातील पहिलीच घटना म्हणावी लागेल काँग्रेसचे नगरसेवक गणेश भोस यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांकडे नगराध्यक्षा शुभांगी पोटे यांना पदावरून हटवण्याबाबत अर्ज दाखल केला आहे सत्ताधारी काँग्रेसचे ५ व विरोधी भाजपचे ११ असे एकूण १६ नगरसेवकांच्या त्यावर सह्या आहेत नगराध्यक्षा पोटे या मनमानी कारभार करत आहेत तसेच नगरसेवकांमध्ये दुजाभाव करत असून विश्वासात घेत नाहीत त्यांच्या कार्यकाळात नगरपरिषदेच्या अनेक कामात अनियमितता असून अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे त्यांच्या काळात घडली आहेत असे जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या अर्जात म्हंटले आहे
श्रीगोंदा नगरपरिषदेत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे ८ तर भाजपचे ११ नगरसेवक असून नगराध्यक्षा पोटे या काँग्रेसच्या चिन्हावर थेट जनतेतून नगराध्यक्ष पदी निवडून आल्या होत्या श्रीगोंदा नगरपरिषदेत काही दिवसांपासून राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती सत्ताधारी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांमध्ये फूट पडली होती काँग्रेसच्या पाच नगरसेवकांनी नगराध्यक्षा पती तथा काँग्रेसचे गटनेते मनोहर पोटे यांच्या विरोधात भूमिका घेत त्यांना गटनेते पदावरून हटवून गणेश भोस यांची गटनेते पदी नियुक्ती केली होती परंतु या पाच नगरसेवकांची पोटे यांच्यावरील नाराजगी इथेच थांबली नाही तर आज त्यांनी विरोधी भाजपच्या ११नगरसेवकांना सोबत घेत सदर अविश्वास ठराव दाखल केला आहे
काँग्रेसचे ५ नगरसेवक विरोधात गेल्यामुळे आता राष्ट्रवादीचे २नगरसेवक स्वतः मनोहर पोटे व नगराध्यक्षा शुभांगी पोटे असे ४जण विरुद्ध विरोधात गेलेले ५ नगरसेवक व भाजपचे ११नगरसेवक असे १६नगरसेवक असे १६ विरुद्ध ४ असे चित्र आता श्रीगोंदा नगरिषदेत तयार झाले आहे
चौकट/-श्रीगोंदयातील राजकीय हालचालींवर थेट मुंबईतून लक्ष
श्रीगोंदा नगरपरिषदेत होत असलेल्या या राजकीय बदलाला थेट मुंबईतील नेत्यांकडून पाठबळ मिळत आहे या सर्व प्रक्रियेवर मुंबईतून लक्ष ठेवले जात आहे


श्रीगोंदा नगरपरिषदेच्या राजकारणात भूकंप श्रीगोंदा नगरपरिषदेच्या राजकारणात भूकंप Reviewed by Prashasak on नोव्हेंबर ०४, २०२२ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.