प्रशासक न्यूज,दि.२३ऑक्टोबर
श्रीगोंदा शहरातील बंद घरे टार्गेट केल्यानंतर चोरट्यानी आपला मोर्चा आता देवाच्या मंदिराकडे वळवल्याचे दिसत आहे आज मध्यरात्री श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगाव येथे श्री स्वामी समर्थ केंद्र मंदिराच फाकट तोडून चोरट्यानी मंदिरातील दानपेटीच चोरून नेली आहे त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे लोकांसोबतच आता देव देखील सुरक्षित राहिले नसल्याने सगळीकडे घबराटीचे वातावरण आहे
ही दानपेटी दरवर्षी दिवाळीला उघडली जाते आता दोन दिवसात ही दानपेटी उघडण्यात येणार होती त्याआधीच चोरट्यानी डल्ला मारत दानपेटी चोरून नेली आहे सदर मंदिर हे कधी बंद तर कधी चालू असते काल रात्री हे मंदिर उघडे होते अशी माहिती समजली आहे पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेतली आहे
मागच्या आठवड्यातच घायपतवाडी येथील मंदिरातील मूर्तीची नासधूस करून तेथील पितळी घंटा चोरट्यानी चोरून नेल्या होत्या त्यानंतर आता आठवड्याभारतच मंदिरात चोरीची ही दुसरी घटना आहे
चोरांचा आता मंदिरांवर डोळा,या मंदिरात चोरी,श्रीगोंदा तालुक्यातील घटना
Reviewed by Prashasak
on
ऑक्टोबर २२, २०२२
Rating:
Reviewed by Prashasak
on
ऑक्टोबर २२, २०२२
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: