प्रशासक न्यूज,दि.२१ऑक्टोबर
सतत पडत असलेल्या परतीच्या पावसाने खरीप हंगामातील कापूस, कांदा, सोयाबीन, तूर मूग, उडीद तसेच फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पंचनाम्याची वाट न पाहता ओला दुष्काळ जाहिर करुन शेतकऱ्यांना एकरी ५०,००० मदत जाहिर करावी व पिक विम्याची रक्कम तात्काळ देण्यात यावी, तसेच शेतकऱ्यांचे जुन २०२२ पासून चे वीजबील माफ करावे, या मागण्यांसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसपार्टीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार व माजी आमदार राहुल जगताप यांच्या नेतृत्वाखाली कोळगाव येथे आज सकाळी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाला महाराष्ट्र राज्य बाजार समिती अध्यक्ष बाळासाहेब नाहटा,हेमंत नलगे,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष हरिदास आबा शिर्के, मा.व्हा.चेअरमन एकनाथराव बारगुजे, विश्वासराव थोरात, संचालक मच्छिंद्र नलगे, अशोक शितोळे, बाळासाहेब नलगे, विजुपाटील नलगे, भास्करराव कदम, प्रमोद जगताप, सुरेशदादा गोरे, सुभाषराव काळाणे, सयाजी लगड, विलास शितोळे, सचिन जठार, शरद खोमणे, संतोष खरात, दत्तात्रय भापकर, नितीन शिंदे, नंदू लगड, नितीन डुबल, चंद्रकांत काटे, रामभाऊ लाटे, जिवन लगड, अमित लगड, सतिष सावकार, बिभीषन निंभोरे, पप्पु वागसकर, योगेश तोंडे, गाडेकर नाना, लक्ष्मीकांत लगड, बंडू पाटील कातोरे, तसेच कोळगाव, चिखली, कोरेगाव, सुरेगाव, घुटेवाडी, उख्खलगाव, मुंगूसगाव, विसापुर, पिंपळगाव पिसा, घारगाव, पारगाव, भानगाव, कोथुळ, ढोरजा येथील शेतकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
यावेळी प्रशासनाला लेखी निवेदन देण्यात आले.सरकारने शेतकऱ्यांचा अंत न पाहता व पंचानाम्याची वाट न पाहता लवकरात लवकर शेतकऱ्यांना सरसकट एकरी रुपये ५०,००० रुपये मदत द्यावी ही सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मागणी करण्यात आली.एक तासानंतर निवेदन देऊन आंदोलन मागे घेण्यात आले या रास्ता रोकोमूळे या महामार्गावर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागून वाहतूक ठप्प झाली होती
शेतकरी प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर
Reviewed by Prashasak
on
ऑक्टोबर २१, २०२२
Rating:
Reviewed by Prashasak
on
ऑक्टोबर २१, २०२२
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: