ऐन दिवाळीच्या तोंडावर श्रीगोंदा पोलिसांसमोर हे आव्हान


प्रशासक न्यूज,दि.२१ऑक्टोबर

दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे त्यातच श्रीगोंदा शहरात मागील दोन दिवसात घरफोडयांच प्रमाण वाढलं आहे त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीच वातावरण असून या घरफोड्या रोखण्याच आव्हान श्रीगोंदा पोलिसांसमोर उभ ठाकल आहे
शहरातील पेडगाव रस्त्यावरील शिवपार्वती सोसायटी व प्रोफेसर कॉलनी परिसरात सोमवारी रात्री या एकाच भागात सलग तीन घरफोड्या झाल्या त्यात सोने,चांदी रोकड असा लाखोंचा मुद्देमाल चोरट्यानी चोरून नेला तर मंगळवारी रात्री देखील याच भागात पेडगाव रस्त्यावर शिवपार्वती सोसायटीत पुन्हा चोरट्यानी डल्ला मारला त्याठिकाणी जास्त मुद्देमाल चोरीला गेला नसला तरी सलग दोन दिवस मोठी रहिवासी संख्या असलेल्या भागात चोरट्यानी धाडसी घरफोडी केल्यामुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर नागरिकांमध्ये भीतीच वातावरण पसरलं आहे
त्यामुळे या घरफोडी करणाऱ्या चोरट्याना तातडीने जेरबंद करण्याची जबाबदारी पोलिसांवर असणार आहे
चौकट-नागरिकांनीदेखील सतर्क राहणे गरजेचे
नागरिकांनीसुद्धा आपल्या भागात,सोसायटीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे गरजेचे आहे तसेच आपल्या घरात रोख रक्कम,सोने चांदी असा मुद्देमाल ठेवू नये सतर्क राहणे गरजेचे आहे
चौकट/-बंद घरे चोरट्याकडून टार्गेट
शहरातील अनेक दिवस बंद असणारी घरे चोरट्यांकडून टार्गेट होत आहेत त्यामुळे दिवसा रेकी करून रात्री च्या वेळेस चोरटे अशी बंद घरे फोडून चोऱ्या करत आहेत

ऐन दिवाळीच्या तोंडावर श्रीगोंदा पोलिसांसमोर हे आव्हान ऐन दिवाळीच्या तोंडावर श्रीगोंदा पोलिसांसमोर हे आव्हान Reviewed by Prashasak on ऑक्टोबर २१, २०२२ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.