स्विफ्टच्या डिक्कीत रोकड ठेवून झोपणे अंगलट;साडेचार लाख लंपास


प्रशासक न्यूज,दि.१९नोव्हेंबर

स्विफ्ट कारच्या डिक्कीमध्ये ठेवलेली साडेचार लाख रुपयांची रोख रक्कम चोरून नेल्याची घटना श्रीगोंदा शहरातील श्रीगोंदा जामखेड रस्त्यावर महेंद्रा शोरूमजवळ काल दि१८रोजी घडली आहे
या चोरीबाबत संजय उत्तम राऊत रा लासुर स्टेशन,ता.गंगापूर,जि.औरंगाबाद यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे

याबाबत माहिती अशी की फिर्यादी राऊत व त्यांचे दोन पार्टनर मागील काही वर्ष्यापासून भागीदारीमध्ये शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात कापूस खरेदी करण्यासाठी राऊत व त्यांचे पार्टनर हे मागील काही दिवसांपासून श्रीगोंदयात आलेले आहेत त्यांचे लेबर व ते श्रीगोंदा जामखेड रस्त्यावर महेंद्रा शोरुम जवळ भाड्याने रूम घेऊन राहतात

दि १८रोजी रात्री फिर्यादी राऊत हे या रूम बाहेर त्यांची स्विफ्ट कार क्र एम एच १४ एफएम ३०१५मध्ये झोपले होते कापूस विक्रीतून आलेली साडेचार लाख रुपयांची रोख रक्कम त्यांनी कारच्या डीक्कीत ठेवली होती

दि १८ रोजी सकाळी सहा वाजता राऊत यांचे कामगार सकाळी सहा वाजता उठले असता रूममधील सामानाची उचकापचक झालेली दिसली याबाबत त्याने राऊत याना सांगितले असता त्यानंतर राऊत यांनी स्विफ्टची डिक्की उघडून पहिली असता डीककीत ठेवलेली साडेचार लाख रुपयांची रोकड चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला धाव घेत तक्रार दाखल केली पोलीस पुढील तपास करत आहेत


चौकट/-लोकांनी सावधानता बाळगणे गरजेचे
चारचाकी गाडीत सीटवर ठेवलेली रोकड लांबवणे किंवा दुचाकीच्या डीक्कीतील रोकड लांबवणे अश्या घटना घडत असताना सुद्धा नागरिक यातून काही बोध घेताना दिसत नाहीत अश्या प्रकारे चोरीच्या घटना घडत असल्यामुळे लोकांनी एवढी मोठी रोख रक्कम जवळ बाळगणे चुकीचे आहे नागरिकांनी सावधानता बाळगणे गरजेचे आहे
स्विफ्टच्या डिक्कीत रोकड ठेवून झोपणे अंगलट;साडेचार लाख लंपास स्विफ्टच्या डिक्कीत रोकड ठेवून झोपणे अंगलट;साडेचार लाख लंपास Reviewed by Prashasak on नोव्हेंबर १९, २०२२ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.