प्रशासक न्यूज,दि.२१सप्टेंबर
शहर सहकारी बँकेच्या बनावट सोनेतारण प्रकरणाचा गुन्हा दाखल होण्याच्या दीड महिना अगोदर हे प्रकरण समोर आले होते. त्यावेळी गुन्हा का दाखल झाला नाही, गुन्हा दाखल न होण्यामागे कोतवाली पोलिस ठाण्यातील कोणाचा समावेश आहे का? आदी बाबत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी पोलिस उपअधीक्षक अनिल कातकाडे यांना दिले आहेत. दरम्यान, हे प्रकरण दाबण्याचा तर प्रयत्न नव्हता ना, असा सवाल उपस्थित झाला आहे.
बँकेत बनावट सोने आढळून आल्याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून तपास योग्य दिशेने सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. घोटाळ्यातील आरोपींची संख्या ३९ झाली आहे. मात्र, गुन्हा दाखल होण्याच्या आधी दीड महिन्यापूर्वी कोतवाली पोलिस ठाण्यात काही घटना घडल्याची चर्चा आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर या घटनेला वाचा फुटली आहे. यानंतर प्रभारी अधिकाऱ्यांनी कोतवाली पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रगटीकरण शाखा (डिबी) बरखास्त केली. दरम्यान यापूर्वीच गुन्हा का दाखल झाला नाही. गुन्हे दाखल न होण्यामागे कोण पोलिस आहेत. काही तडजोडी झाल्या आहेत का? याची चौकशी उपअधीक्षक कातकडे करणार आहेत.
'ते' प्रकरण दबण्याचा प्रयत्न;पोलीस अधिक्षकांकडून चौकशीचे आदेश
Reviewed by Prashasak
on
सप्टेंबर २०, २०२२
Rating:
Reviewed by Prashasak
on
सप्टेंबर २०, २०२२
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: