लोकवर्गणीतून साळवनदेवीरोड चे रूप पालटले.


प्रशासक न्यूज,दि.२१सप्टेंबर

श्रीगोंदा - श्रीगोंदा शहरात महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या साळवनदेवी रोड चे रूप बदलले आहे. नवरात्र उत्सवाच्या पूर्वसंध्येला माजी उपनगराध्यक्ष नानासाहेब कोथिंबीरे यांच्या संकल्पेतून येथील ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून विविध कामे मार्गी लावली आहेत.

माता साळवनदेवी चा नवरात्र उत्सव मोठ्या धुमधडाक्यात येथे साजरा करण्यात येतो. या कालावधीत मध्ये हजारो भाविक या रस्त्याने दर्शनासाठी जातात. रस्त्यांवरील पडलेले दुभाजक दुरुस्त करणे, त्यांना रंगकाम करणे, दुभाजक मध्ये माती भरणे, फुलझाडे लावणे, रस्त्यावरील खड्डे, काही ठिकाणी चेंबर नादुरुस्त असल्याने रस्ता जलमय होणे आदी समस्या येथे निर्माण झाल्या होत्या. श्रीगोंदा नगरपालिककेची ही जबाबदारी होती मात्र नगरपालिका कधी कामे करील याची वाट न पाहता येथील ग्रामस्थांनी पुढाकार घेत वरील सर्व कामे मार्गी लावली.

लोकवर्गणीतुन या रोडचा चेहरा मोहरा बदला आहे. ही संकल्पना माजी उपनगराध्यक्ष नाना कोथिंबीरे यांनी मांडली. त्यास माता साळवनदेवी तरुण मंडळाच्या सदस्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यामध्ये बंटी कोथिंबीरे, नागराज कोथिंबीरे, विशाल कोथिंबीरे, दादा कोथिंबीरे, लक्ष्मण कोथिंबीरे, माजी नगरसेवक गोरख कोथिंबीरे, अनिल कोथिंबीरे, अजय कोथिंबीरे, बाबू बोडखे, लहू धुमाळ, अजिनाथ जाधव, बंडू कोथिंबीरे, नितीन सोनवणे आदींनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला. उद्योजक रवी बायकर व बापू गोरे यांनी फुलझाडे येथे भेट दिली.




लोकवर्गणीतून साळवनदेवीरोड चे रूप पालटले. लोकवर्गणीतून साळवनदेवीरोड चे रूप पालटले. Reviewed by Prashasak on सप्टेंबर २०, २०२२ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.