प्रशासक न्यूज,दि.२१सप्टेंबर
राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. एकनाथ शिंदे-भाजप सरकारने राज्यातील तरुण-तरुणींना मोठी गूडन्यूज देणार आहे. राज्यात लवकरच तब्बल 75 हजार रिक्त पदं भरण्यात येणार आहे. या मेगा भरतीची घोषणा दसऱ्याच्या शुभमुहुर्तावर करण्यात येणार आहे. तसेच या मेगा भरतीसाठी विशेष संस्था नेमण्यात येणार आहे.
राज्य सरकारची पुढील आठवड्यात नेहमीप्रमाणे मंत्रिमंडळ बैठक पार पडणार आहे. या बैठकीत मेगा भरतीसाठी विशेष संस्थेची नेमणूक केली जाणार आहे. रेल्वे आणि केंद्रीय परीक्षाच्या धर्तीवर ही मेगा भरतीची परीक्षा होणार आहे.
राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून विविध विभागांमधील अनेक पदं रिक्त आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय आणि शासकीय कामं अपेक्षित वेळेत होण्यात विलंब होतो. तसेच राज्यात अनेक तरुण-तरुणी हे शासकीय नोकरीच्या उद्देशाने तयारी करतायेत. आता सरकारच्या या गुडन्यूजमुळे तरुणांमध्ये आनंदाचं वातावरण आहे
शिंदे-फडवणीस सरकार तब्बल इतकी हजार रिक्त पदं भरणार, तरुणांसाठी खुशखबर
Reviewed by Prashasak
on
सप्टेंबर २१, २०२२
Rating:
Reviewed by Prashasak
on
सप्टेंबर २१, २०२२
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: