प्रशासक न्यूज,दि.३०सप्टेंबर
दरवर्षीप्रमाणे काष्टी ते साळवणदेवी(श्रीगोंदा)अशी पायी जाणारी जवळपास पाचशे महिलांची दिंडी आज श्रीगोंदयात आली असता माजी उपनगराध्यक्ष राजुदादा गोरे व नगरसेविका सौ सीमाताई प्रशांत गोरे यांनी गोरे परिवाराच्या वतीने या दिंडीचे जोरदार स्वागत केले
दरवर्षी नवरात्रोत्सवात ही महिलांची दिंडी काष्टीतून श्रीगोंदयातील प्रसिद्ध अश्या साळवणदेवी मंदिरापर्यत पायी प्रवास करत दर्शनासाठी येत असते काष्टी येथील सौ रत्नमाला भगवानराव पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली ही दिंडी निघत असते दरवर्षी श्रीगोंदयातील गोरे परिवाराच्या वतीने या पायी येणाऱ्या महिला भक्तांसाठी शहरातील तुळशीदास मंगल कार्यालयात फराळाची व्यवस्था केली जाते सालाबादप्रमाणे आज देखील या महिला भाविकांसाठी फराळाची व्यवस्था करण्यात आली होती फराळ झाल्यानंतर कार्यालयातच देवीची गाणे,देवीचा जागर हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला
यावेळी या महिला भाविकांना शुभेच्छा देण्यासाठी नागवडे कारखान्याचे उपाध्यक्ष जेष्ठ नेते बाबासाहेब भोस,भगवानराव पाचपुते,ज्ञानेश्वर विखे,सौ सुवर्णाताई पाचपुते,नगरसेवक संतोष कोथिंबीरे,अंबादास औटी,संभाजी कोकाटे यांच्यासह भाविक,व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन प्रशांत गोरे यांनी केले
'त्या' महिला भाविकांचे श्रीगोंदयात जोरदार स्वागत
Reviewed by Prashasak
on
सप्टेंबर ३०, २०२२
Rating:
Reviewed by Prashasak
on
सप्टेंबर ३०, २०२२
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: