प्रशासक न्यूज,दि.३०सप्टेंबर
आपल्या वाढदिवसानिमित्त कुठलाही डामडौल किंवा मोठा गाजावाजा न करता त्या खर्चाला फाटा देत विद्यार्थ्यांच्या उजवल भविष्यासाठी श्रीगोंदा शहरातील साळवणदेवी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला तीन व्हाईट बोर्ड भेट देण्याचा सामाजिक उपक्रम राबवल्याबद्दल डॉ चंद्रकांत माधव कोथिंबीरे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे
आज या बोर्डचा लोकार्पण सोहळा जेष्ठ नेते बाबासाहेब भोस यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी उपनगराध्यक्षा सौ.ज्योतीताई खेडकर, प्रभागाचे नगरसेवक श्री संतोष कोथिंबीरे,नगरसेवक श्री प्रशांत गोरे मा उपनगराध्यक्ष राजूदादा गोरे,श्री अशोक आळेकर,श्री नाना शिंदे,श्री भीमा कोथिंबिरे,श्री राजू शिंदे,श्री नवनाथ दरेकर तसेच काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक व स्वागत सौ लोखंडे मॅडम यांनी केले.
डॉ चंद्रकांत कोथिंबिरे यांनी दिलेल्या अनमोल भेटीचे शाळा व व शाळा व्यवस्थापन समिती कोथिंबीरे मळा यांच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करण्यात आले
या कार्यक्रमासाठी लक्ष्मण भाऊ कोथिंबीरे ,भाऊसाहेब कोथिंबीरे ,नवनाथ दरेकर साहेब गोपाळ डांगे ,संदीप भैय्या कोथिंबीरे ,आप्पासाहेब सोनवणे, राजू शिंदे, नाना कोथिंबीरे, बबन कोथिंबिरे, उत्तम पवार ,नानाभाऊ अनारसे ,शनि धुमाळ ,बंटी दादा कोथिंबिरे, काळू जगताप, विशाल कोथिंबीरे ,नागराज कोथिंबिरे ,सोनू कोथिंबीरे, आरिफ शेठ मालजपते,तेजस कोथिंबीरे ,अनिकेत धुमाळ ,प्रज्वल कोथिंबीरे,समीर कोथिंबीर ,सागर कोथिंबीरे, सागर रसाळ, प्रकाश कोथिंबीरे ,तुषार पवार ,प्रतीक काळे, स्वप्नील बोडखे, , लहू धुमाळ सचिन काळे,गजू कोथिंबिरे, सुदाम शेठ कोथिंबीरे, गणेश कोथिंबीरे उपस्थित होते
कार्यक्रमाचे आभार शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ अश्विनीताई कोथिंबीरे यांनी मानले
वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत राबवलेल्या 'त्या' उपक्रमाचे कौतुक
Reviewed by Prashasak
on
सप्टेंबर ३०, २०२२
Rating:
Reviewed by Prashasak
on
सप्टेंबर ३०, २०२२
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: