'त्या' Insta Star महिला कंडक्टरवर कारवाई रिल्समुळे नाही... तर 'या' कारणाने


प्रशासक न्यूज,दि.४ऑक्टोबर

स्वत:चे व्हिडिओ तयार करून सोशल मीडियात व्हायरल करणं धाराशिव जिल्ह्यातल्या एका लेडी कंडक्टरला चांगलंच महागात पडलंय. तिच्यावर एसटी महामंडळानं निलंबनाची कारवाई केलीय. मंगल सागर पुरी असं या इन्स्टा स्टारचं नाव आहे. कळंबा आगारातील मंगल पुरींचा गुन्हा इतकाच की कंटक्टरचा ड्रेस घालून त्यांनी इन्स्टा रील तयार केले. त्यांनी तुळजाभवानीच्या गाण्यावर तयार केलेला व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय.

मात्र अशा व्हिडिओमुळे एसटी महामंडळाची प्रतिमा मलीन झाल्याचं सांगत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली त्यानंतर लगेचच घुमजाव करत ड्रायव्हर सीटवर बसून गैरवर्तन केल्याचा ठपका एसटी महामंडळांनं ठेवलाय. इतकच नाही तर त्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या सहकाऱ्यालाही निलंबित करण्यात आलंय.

एसटी महामंडळाच्या निर्णयाविरोधात मंगल पुरींनी तीव्र नाराजी व्यक्त केलीय. कोणतीही पूर्वकल्पना न देता आकसापोटी आपल्यावर कारवाई करण्यात आली आहे असा आरोप निलंबित महिलेने एसटी महामंडळावर केला आहे.राज्यात एसटी महामंडळात काम करणारे इतर कंडक्टर, ड्रायव्हर, मेकॅनिकल वेगवेगळे रिम्स बनवतात. त्यांच्यावर मात्र कारवाई नाही. एवढंच नाही तर माझ्याबरोबर व्हिडिओ बनवणाऱ्यावर कारवाई नाही फक्त आकसापोटी माझ्यावर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई आकसापोटी करण्यात आलेली आहे माझे निलंबन मागे घ्या अन्यथा कायदेशीर लढाई लढणार असल्याचा इशारा मंगलगिरी यांनी एसटी महामंडळाला दिला आहे

संपात सहभाग न घेतल्याचा राग
निलंबित कंडक्टर मंगल गिरी आणि एसटी महामंडळातील अधिकारी यांच्यातील वाद जुनाच आहे .गेल्या वर्षभरापूर्वी य वादाला सुरुवात झाली आहे . मंगल गिरी यांनी संपात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला त्यामुळे कळंब आगारातील एसटी कर्मचारी ,अधिकारी आणि मंगल गिरी यांच्यात वाद झाला होता .हा वाद पोलिसात गेला होता . आपापसात समजूत करून हा वाद कसाबसा मिटला मात्र त्यांच्यातील धुसफूस सुरूच होती आणि अचानक शनिवारी मंगल गिरी यांना निलंबित केल्याची नोटीस काढण्यात आली. ही नोटीस प्रत्यक्षात मंगल गिरी यांना न देता कळंब आगारातील फलकावर अडकवण्यात आली .

मंगल पुरी यांच्यावरील कारवाईवरून सोशल मीडियात संतापाची लाट उसळलीये. या कारवाईनं अनेक सवाल उपस्थित झालेत.

स्वत:चे रील करणं गुन्हा आहे का?

पोलीस वर्दीत डान्स करू शकतात मग बस कंडक्टर का नाही?

मंगल पुरींच्या व्हिडिओंमुळे बसची प्रतिमा मलीन कशी झाली?

मंगल पुरींच्या व्हिडिओंमध्ये आक्षेपार्ह्य काय आहे?

खरं तर कामाचा ताण कमी व्हावा म्हणून अनेक जण रील, व्हिडिओ तयार करून सोशल मीडियात व्हायरल करत असतात. मात्र केवळ नियमांचा बागुलबुवा दाखवून कुणावर अशी कारवाई करणं हे चूकच. त्यामुळे मंगल पुरींवरील कारवाईवरून उपस्थित झालेल्या प्रश्नांची उत्तरंही एसटी महामंडळानं द्यायला हवीत.
'त्या' Insta Star महिला कंडक्टरवर कारवाई रिल्समुळे नाही... तर 'या' कारणाने 'त्या' Insta Star महिला कंडक्टरवर कारवाई रिल्समुळे नाही... तर 'या' कारणाने Reviewed by Prashasak on ऑक्टोबर ०३, २०२२ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.