'ती' दाक्षिणात्य टोळी महाराष्ट्रात सक्रिय:नगरमध्येही काही काळ वास्तव्य


प्रशासक न्यूज,दि.३०सप्टेंबर

नागरिकांशी ओळख वाढवून नंतर परदेशात नातेवाईक असल्याचे सांगत त्यांच्याकडून स्वस्तात सोने, कपडे मिळवून देण्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक करणारी, सहकार्य न केल्यास खून करणारी दाक्षिणात्य राज्यातील टोळी महाराष्ट्रात सक्रिय झाली आहे.

नगरसह काही जिल्ह्यांत या टोळीने नागरिकांना आमिष दाखवले असल्याचे समोर आले असून त्यांच्या शोधासाठी केरळ पोलिसांचे पथक राज्यात दाखल झाले आहे. समीरा रंगावाला ऊर्फ सिमरन, सौम्या रंगावाला ऊर्फ फरिदा ऊर्फ सुधा ऊर्फ गीता व आमिर अली ऊर्फ आर्यन अशी या आरोपींची नावे आहेत. वेगवेगळ्या नावाने वेशांतर करून ते विविध राज्यांत व जिल्ह्यांत नागरिकांची फसवणूक करत आहेत. या तिघांच्या टोळीवर तेलंगणा, आंध्र प्रदेश व केरळमध्ये तीन खुनांसह फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल आहेत

नगरमध्ये वास्तव्य, सेल्फीही काढल्या
नगर शहरातही या तिघांचे काही काळ वास्तव्य होते. त्यांनी येथील तीन कुटुंबीयांसमवेत ओळखही निर्माण केली होती. त्यातील काहींबरोबर काढलेले सेल्फीही तपासात उपलब्ध झाले आहेत. या कुटुंबीयांना स्वस्तात सोन्याचे व व्यवसायात गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. मात्र, त्यांना शंका आल्याने त्यांनी संबंध तोडले.

'ती' दाक्षिणात्य टोळी महाराष्ट्रात सक्रिय:नगरमध्येही काही काळ वास्तव्य 'ती' दाक्षिणात्य टोळी महाराष्ट्रात सक्रिय:नगरमध्येही काही काळ वास्तव्य Reviewed by Prashasak on सप्टेंबर २९, २०२२ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.