प्रशासक न्यूज,दि.५सप्टेंबर
श्रीगोंदा नगरपरिषदेचे गटनेते व नगराध्यक्ष पती मनोहर पोटे यांना त्यांच्याच जवळच्या विश्वासू सहकारी नगरसेवकांनी धक्का दिला आहे पोटे मनमानी कारभार करत असल्याचा आरोप करत त्यांना गटनेते पदावरून हटवत गणेश भोस यांची गटनेते पदी बहुमताने नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र आज नगरसेवीका सीमा गोरे,नगरसेविका सोनाली घोडके,नगरसेवक संतोष कोथिंबीरे,नगरसेवक निसार बेपारी,नगरसेवक गणेश भोस या पाच नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे
मनोहर पोटे हे मनमानी कारभार करत आहेत सहकारी नगरसेवकांना विश्वासात घेत नाहीत,कोणतेही निर्णय बहुमताने घेतले जात नाहीत गटविरोधी कारवाया केल्या जातात गटनेत्यांवर वैयक्तिक अर्ज व तक्रारी दाखल झाल्या असून अश्या परिस्थितीत त्यांनी गटनेतेपदी राहणे हे बहुमताचे विरुद्ध आहे याबाबत बैठक घेण्यात आली त्याला देखील गटनेते मुद्दाम गैरहजर राहिले त्यामुळे त्या बैठकीत बहुमताने गटनेता बदलण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानुसार गणेश भोस यांची श्रीगोंदा नगरपरिषदेच्या गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आल्याचे आज नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हंटले आहे
श्रीगोंदा नगरपरिषदेत भाजप चे बहुमत असले तरी काँग्रेस च्या शुभांगी पोटे या नगराध्यक्षा आहेत नगरपरिषदेत सत्ता आल्यापासून विरोधी आणि सत्ताधारी नगरसेवक एकत्रीत येऊन काम करत होते कुठेही कधी फारसा विरोध पाहायला मिळाला नाही परंतु आज पोटे यांच्या विश्वासू सहकारी नगरसेवकांनीच त्यांना गटनेते पदावरून हटवल्याचे पत्र दिल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे
विश्वासात घेत नसल्याचे कारण चुकीचे,नाराजगी वेगळ्याच कारणासाठी योग्य वेळ आल्यावर पुराव्यानिशी आपण उत्तर देऊ/-नगरसेवक मनोहर पोटे
आपण नगरसेवकांना विश्वासात घेत नाही हे कारण चुकीचे आहे मागील साडेतीन वर्ष्यात सर्वात जास्त निधी गणेश भोस यांच्या वार्डात दिलेला आहे राजाभाऊ लोखंडे व संगीता मखरे हे दोन नगरसेवक राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलेत तरी ते आपल्यासोबत आहेत आणि काँग्रेस च्या चिन्हावर निवडून आलेले विरोधात गेलेत त्या सर्व नगरसेवकांच्या नाराजीचे कारण वेगळे आहे योग्यवेळी पुराव्यासह आपण उत्तर देऊ यापुढे देखील मीच गटनेते पदी राहणार असल्याचा विश्वास देखील नगरसेवक मनोहर पोटे यांनी प्रशासक न्यूज शी बोलताना व्यक्त केला
नगरपरिषदेचे गटनेते मनोहर पोटे यांना सहकारी नगरसेवकांचा 'धक्का'
Reviewed by Prashasak
on
सप्टेंबर ०५, २०२२
Rating:
Reviewed by Prashasak
on
सप्टेंबर ०५, २०२२
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: