गटबाजी आणि फोडाफोडीचे राजकारण महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला गालबोट लावणार:अजित पवार


प्रशासक न्यूज,दि.३सप्टेंबर

स्व बाळासाहेब ठाकरे यांच स्वप्न होत की,शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही त्यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्रच मुख्यमंत्री केलं राष्ट्रवादी आणि काँग्रेस फुटली नाही पण ठाकरेंच्या विश्वासू आणि जवळच्याच लोकांनी दगाफटका केला त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री पद सोडावं लागलं अलीकडे पक्षांतर्गत होणारी गटबाजी ही धोकेदायक आहे फोडाफोडीच राजकारण हे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला गालबोट लावणार आहे असं मत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज श्रीगोंदयात बोलताना व्यक्त केले

श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजारसमिती मध्ये उभारलेल्या एक हजार मेट्रिक टन गोडवूनचे उदघाटन व राज्य बाजारसमितीचे सभापती बाळासाहेब नाहाटा यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमप्रसंगी पवार बोलत होते

या कार्यक्रमासाठी आमदार अशोक पवार,आ निलेश लंके,आ संग्राम जगताप,आ आशुतोष काळे,आ प्राजक्त तनपुरे,माजी आमदार रमेश थोरात,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके,नगराध्यक्षा शुभांगी पोटे,मुंबई बाजारसमितीचे सभापती अशोक डक यांच्यासह दौंड,पारनेर,श्रीगोंदा तालुक्यातील मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते

यावेळी बोलताना अजित पवार यांनी सर्वांचे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष लागले असून सध्या नुसती तारीख पे तारीख सुरू आहे महाविकास आघाडी सरकार आलं तेव्हा आमच्यात काहीजण म्हणत होते हे सरकार २५वर्षे टिकेल मी त्यांना म्हणलं अरे पाच वर्षे तरी टिकू दे पण काही वाचाळवीर असतात उचलली जीभ लावली टाळ्याला असे म्हणत त्यांनी टीका केली तसेच जनतेतुन नगराध्यक्ष सरपंच निवडण्याला आपला विरोध होता पण बहुमताच्या जोरावर सत्ताधार्यांनी हे विधेयक पास केलं मुख्यमंत्री,पंतप्रधान सुद्धा जनतेतू निवडला जावा अशी आपली मागणी असल्याचे पवार यांनी सांगत त्यामध्ये दुजाभाव का असा सवालही अजित पवार यांनी सरकारपुढे उपस्थित केला

तसेच राष्ट्रवादीत तरुण आमदारांची संख्या जास्त असून ते सर्व चांगलं काम करत आहेत असेही पवार यांनी सांगितले तसेच राष्ट्रवादी पक्षात नेतृत्व, कर्तृत्व पाहून विविध पदावर संधी दिली जाते असेही त्यांनी सांगितले

काय खड्डे,काय ती डिव्हायडरची काम,पवार स्टाईलमध्ये श्रीगोंदा नगरपरिषदेच्या कारभारावर टीका
मी जेव्हा जेव्हा येतोय तेव्हा तेव्हा श्रीगोंदयात डिव्हायडरची काम चालूच मागच्या तीन चार वर्ष्यापासून ही काम चालू आहेत ती काही पूर्ण होईनात अस म्हणत अजित पवार यांनी श्रीगोंदा नगरपरिषदेच्या गलथान कारभारावर टीका करत चांगलेच वाभाडे काढले तसेच श्रीगोंदयातील रस्ते म्हणजे खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे हेच समजत नाही असाही मिश्किल टोला त्यांनी नगरपरिषदेला लगावला

आमदार असावा तर निलेश लंकें सारखा
यावेळी बोलताना अजित पवार यांनी पारनेर चे आमदार निलेश लंके यांनी कोव्हिडं काळात केलेल्या कामाच कौतुक करत त्यांच्या कामाची जगाने दखल घेतली असे सांगत आमदार असावा तर असा असे म्हणत लंकेच्या कामाचे तोंडभरून कौतुक केले

मीडियाला पण खोचक सल्ला
अलीकडे पत्रकार पण नको ते प्रश्न विचारतात जे गरजेचे नाही ते दाखवतात काही पत्रकारांनी मला विचारलं की काही नेते बारामतीला येणार आहेत त्यावर मी त्यांना सांगितलं की बारामती काय अजित पवार च्या बापाची आहे का ज्याला यायचं त्याला येऊ द्या आम्ही स्वागत करू असे म्हणत मीडियाने सुद्धा नको ते प्रश्न न विचारता नको त्या गोष्टींमध्ये वेळ वाया न घालवता सामाजिक प्रश्न दाखवले पाहिजे असा खोचक सल्ला पवार यांनी मिडीयाला दिला

स्वबळावर निवडणूका लढवण्याला हिरवा कंदील
वेळप्रसंगी तुमचे बोलणे खाऊ पण येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका श्रीगोंदयात स्वबळावर लढू असे मत माजी आमदार राहुल जगताप यांनी आपल्या भाषणात मांडले होते त्यावर बोलताना अजित पवार यांनी प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे निवडणूका स्वबळावर लढायला हरकत नाही पण लढत असताना समोरच्याचा पराभव करण्यासाठी आखणी व योग्य नियोजन करणे गरजेचे आहे असा सल्ला कार्यकर्त्यांना देतानाच श्रीगोंदा तालुक्यात निवडणूका स्वबळावर लढवण्याच्या निर्णयाला एक प्रकारे हिरवा कंदील दाखवला

नाहाटांसह कार्यकर्त्यांना सल्ला
पक्षात जुन्या,नव्याचा भेदभाव न करता एकजुटीने काम करा,तुमच्या पक्षप्रवेशाचा पक्षाला फायदा झाला पाहिजे पक्षाला कुठलंही गालबोट लागणार नाही यासाठी पारदर्शक कांम करा असा सल्ला नाहाटा यांच्यासह सर्वच उपस्थित कार्यकर्त्यांना अजित पवार यांनी दिला

कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार राहुल जगताप यांनी बोलताना नाहाटा यांना टोला लगावत आतापर्यंत नाहाटा नेमके कोणत्या पक्षात होते हेच समजत नव्हतं पण आज त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे ते राष्ट्रवादीचे नेते झालेत फक्त अजित पवार मुख्यमंत्री होईपर्यंत तुम्ही पक्ष सोडू नका असा खोचक टोमणा जगताप यांनी नाहाटाना मारला कारखान्याच्या जबाबदारीमुळे २०१९ च्या विधासभेला आपण लढलो नाही त्यावेळी माझ्याबद्दल पक्ष सोडणार असल्याच्या अनेक चर्चा झाल्या पण मी आज,उद्या कायम राष्ट्रवादीतच राहणार असून अजित पवारच आपले नेते असल्याचे राहुल जगताप यांनी आवर्जून सांगितले

बाळासाहेब नाहाटा यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना २०१९च्या विधासभा निवडणुकीत माझी व स्व सदाशिव आण्णा पाचपुते यांची मैत्री असल्यामुळे आपण बबनराव पाचपुते यांना मदत केली पण पाच वर्षे वाया गेली तालुक्यातील प्रश्न सुटले नाहीत रासप चा प्रदेशाध्यक्ष असताना सुद्धा २०१४ साली राहुल जगताप याना पाठींबा दिला होता याची आठवण करून देत येणाऱ्या सर्व निवडणूक स्वबळावर लढवू आणि त्या जिंकू असा आत्मविश्वास व्यक्त करत राज्यातल्या बाजारसमित्या सक्षम करणार असल्याचे नाहाटानी सांगितले तसेच डिंभे माणिकडोह प्रकल्पाला चालना देण्याची मागणी त्यांनी केली

यावेळी दीपक पाटील भोसले,हरिदास शिर्के,घनश्याम शेलार यांनी आपले मनोगत व्यक्त केले प्रास्ताविक टिळक भोस यांनी केले
गटबाजी आणि फोडाफोडीचे राजकारण महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला गालबोट लावणार:अजित पवार गटबाजी आणि फोडाफोडीचे राजकारण महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला गालबोट लावणार:अजित पवार Reviewed by Prashasak on सप्टेंबर ०३, २०२२ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.