प्रशासक न्यूज,दि.६सप्टेंबर
आजकालची तरुणपिढी कोणत्या दिशेने चालली आहे हे समजायला तयार नाही एकीकडे देश,देशातील जनता सुरक्षित रहावी म्हणून तरुण वयात आपल्या देशासाठी बलिदान देणारे आपल्या देशाचे सैनिक एकीकडे तसेच आई वडिलांच्या मेहनतीचे चीज करण्यासाठी रात्रंदिवस अभ्यास करून जिद्दीने विविध क्षेत्रात यश संपादन करणारे तरुण एकीकडे
तर दुसरीकडे व्यसनाच्या आहारी गेलेले,आयुष्यात काय करायचंय याच ध्येय धोरण नसलेले दिवस रात्र मोबाईल ला चिकटून राहणारे,पोरींच्या मागे टवाळक्या करत फिरणारे तरुण आजकालची तरुणाई चांगल्या गोष्टींऐवजी वाईट गोष्टींकडे पटकन आकर्षित होतांना दिसत आहेत यासाठी पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष देऊन त्यांना समजावणे गरजेचे आहे
श्रीगोंदा शहरातील काही तरुणांमध्ये सध्या भररस्त्यात उभे राहून वेगवेगळ्या पोझ देऊन फोटो सेशन करण्याचे फ्याड तयार झाले आहे शहरातील नक्षत्र मंगल कार्यलयासमोरील श्रीगोंदा पेडगाव रस्त्यावर भररस्त्यात दिवसा,रात्री अनेक तरुण याठिकाणी येऊन बिनधास्तपणे रस्त्याच्या मधे उभे राहून फोटोसेशन करतात या फोटोसेशनमुळे वाहतुकीला अडथळा होऊन अपघात होण्याची श्यक्यता निर्माण झाली आहे
हे फोटोसेशन चे फ्याड या तरुणांसह एखाद्या निष्पाप जिवावर बेतण्याची श्यक्यता निर्माण झाली आहे या तरुणांना कुणी समजावून सांगितले तरी हे तरुण समजावून सांगणाऱ्यालाच दादागिरी करतात अरेरावीची भाषा वापरतात त्यामुळे या तरुणांना आता पोलिसांनी त्यांच्या भाषेत समज देणे गरजेचे झाले आहे
मागे काही दिवसांपूर्वी या तरुणांच्या रस्त्यात सुरू असलेल्या फोटोशेषनमुळे एका दुचाकीस्वाराचा अपघात झाला असता दुचाकीस्वाराने प्रसंगावधान दाखवल्यामुळे अपघात टळला त्यावेळी एका जेष्ठ व्यक्तीने या तरुणांना असे रस्त्यात फोटो न काढण्याबाबत समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता त्या तरुणांच्या जमावाने त्या जेष्ठ व्यक्तीलाच जबर मारहाण केली होती
त्यामुळे आता असे रस्त्यात फोटोशेषण करून अपघाताला निमंत्रण देणाऱ्या उनाड तरुणांना आवर घालण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनावर आहे या तरुणांवर पोलिसी कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे
फोटोसेशन च आलंय फ्याड,तरुणाई झाली त्यासाठी म्याड
Reviewed by Prashasak
on
सप्टेंबर ०५, २०२२
Rating:
Reviewed by Prashasak
on
सप्टेंबर ०५, २०२२
Rating:
.jpg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: