प्रशासक न्यूज,दि.३०ऑगस्ट
कोरोना प्रसार काही प्रमाणात कमी झाल्याने तसंच निर्बंध हटवल्याने शहरी आणि ग्रामीण दोन्ही भाग खुले झाले असून आता गुन्हेगारीच्या घटनाही वाढलेल्या दिसत आहेत. 2021 च्या नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार, महाराष्ट्रात मुंबईमध्ये कोविडच्या दुसऱ्या वर्षात सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद झाली आहे. लॉकडाऊनचं उल्लंघन यामुळेही यातील अनेक गुन्ह्यांची नोंद झाली असावी.
मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र ही मोठी राज्ये आहेत ज्यात प्री-कोविड 2019 आणि 2021 दरम्यान नोंदणीकृत गुन्ह्यांमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे, 2019 आणि 2021 मधील गुन्ह्यांमध्ये सर्वाधिक वाढ झालेली शहरे चेन्नई (154%) आणि मुंबई (56%) आहेत. राज्यानुसार बघायचं झाल्यास, 2021 मध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक (3.67 लाख) गुन्हे झाले, त्यानंतर उत्तर प्रदेशात (3.58 लाख) होते.
देशाच्या आर्थिक राजधानीला केवळ कोविड महामारीचा फटका बसला नाही तर २०२१ मध्ये नोंदवलेल्या गुन्ह्यांमध्येही मोठी वाढ झाली आहे. शहरात दररोज बलात्कार, अपहरण, खून अशा हिंसक प्रकरणांचे किमान 14 गुन्हे दाखल होतात. अहवालात नोंदवल्याप्रमाणे 2021 मध्ये मुंबईत गुन्ह्यांमध्ये 27% (63,689 प्रकरणे) वाढ झाली आहे. 2020 मध्ये हा आकडा 50,158 आणि 2019 मध्ये 40,684 इतका होता.
पोलिसांनी सांगितले की, कोविड-19 लॉकडाऊन दरम्यान जारी केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन झाल्यामुळे प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. खून यासारख्या गंभीर गुन्ह्यांचे तसंच महिला आणि बालकांविरुद्धच्या गुन्ह्यांचे अहवाल कमी झाले आहेत. पण सायबर क्राईम वाढले आहेत आणि त्यामुळे बनावटगिरी आणि फसवणूकही वाढली आहे.
2021 मध्ये मुंबईत चोरीचे 7820 गुन्हे, खोटे बोलणे, फसवणुकीचे 4899, अतिवेगाने वाहन चालवण्याचे 2282, अपहरणाचे 1590, लैंगिक छळाचे 401, निष्काळजीपणामुळे मृत्यूचे 386, खूनाचे 162 गुन्हे नोंदवले गेले आहेत.
आर्थिक राजधानीला आता गुन्हेगारीचा विळखा
Reviewed by Prashasak
on
ऑगस्ट २९, २०२२
Rating:
Reviewed by Prashasak
on
ऑगस्ट २९, २०२२
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: