प्रशासक न्यूज,दि.३०ऑगस्ट
वीस ते बावीस निष्पाप लोकांचे हाकनाक बळी गेल्यानंतर अखेर आता प्रशासनाला जाग आली असून पोलीस बंदोबस्तात व श्रीगोंदा महसूल अधिकारी यांच्या उपस्थितीत अखेर मागील अनेक दिवसांपासून रखडलेले दौंड नगर महामार्गावरील कोळगाव हद्दीतील कुकडी कॅनॉल परिसरातील रस्त्याच्या कामाला काल सुरुवात झाली आहे
सदर ठिकाणी या रस्त्याचे काम रखडल्यामुळे अपघात होऊन आतापर्यत जवळपास एकूण वीस ते बावीस जणांचा मृत्यू झालेला आहे अपघात झाल्यानंतर या रखडलेल्या रस्त्याच्या कामाची मागणी जोर धरत होती पण त्याकडे प्रशासन डोळेझाक करत होते
मागील आठवड्यातच टेंपो ने धडक दिल्यामुळे याचठिकाणी दौंड येथील दाम्पत्याला आपला जीव गमवावा लागला होता त्यानंतर प्रवाश्यांसह नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली होती त्यामुळे प्रशासनाने आता तातडीने पावले उचलत काल पोलीस बंदोबस्तात या रखडलेल्या रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे तसेच हा रस्ता अडवणाऱ्या तक्रारदाराला जमिनीचा मोबदला लवकरात लवकर दिला जाईल असे पत्र रस्ते विकास महामंडळ यांच्या वतीने देण्यात आले आहे या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाल्यामुळे प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे
यावेळी बेलवंडी पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी तसेच महसुल व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ चे अधिकारी उपस्थित होते
वीस जणांचे बळी गेल्यानंतर अखेर प्रशासनाला जाग
Reviewed by Prashasak
on
ऑगस्ट २९, २०२२
Rating:
Reviewed by Prashasak
on
ऑगस्ट २९, २०२२
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: