रस्त्याच्या कडेला उभे असणाऱ्या तिघांना उडवले,एक जण जागीच ठार


प्रशासक न्यूज,दि.२१ऑगस्ट

दुचाकी पंक्चर झाल्यामुळे पायी उतरून गाडी ढकलत चाललेल्या पती,पत्नी सह एका व्यक्तीला पाठीमागच्या बाजूने येऊन एका टेम्पो वाल्याने धडक दिल्यामुळे एकाचा मृत्यू तर दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील दौंड नगर रस्त्यावर कोळगाव नजीक लगड वस्ती परिसरात आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे

संभाजी मानसिंग मोहिते अंदाजे वय 50 रा दौंड यांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला आहे

याबाबत समजलेली माहिती अशी की आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मोहिते पती पत्नी दौंडच्या दिशेने जात असताना त्यांची दुचाकी पंक्चर झाली त्यामुळे ते दोघे पती पत्नी दुचाकी ढकलत जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी माणुसकी दाखवत तुम्ही आमच्या दुचाकीवर जा आम्ही तुमची गाडी घेऊन येतो अशी चर्चा केली त्याचवेळी पाठीमागून आलेल्या नगरच्या दिशेने जाणाऱ्या एका टेम्पोने या रस्त्याच्या बाजूला उभ्या असणाऱ्या तीन व्यक्तींना जोराची धडक दिली त्यात मोहिते यांच्या डोक्याला मार लागल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे

टेम्पो चालक टेंपो सोडून पसार झाला आहे बेलवंडी पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत

या अपघातानंतर लगड वस्तीनजीक असलेल्या नादुरुस्त रस्त्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे
रस्त्याच्या कडेला उभे असणाऱ्या तिघांना उडवले,एक जण जागीच ठार रस्त्याच्या कडेला उभे असणाऱ्या तिघांना उडवले,एक जण जागीच ठार Reviewed by Prashasak on ऑगस्ट २१, २०२२ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.