सगळीकडे शोधलं पण सापडले नाहीत; शेवटी मुरूमाच्या खाणीजवळ आढळले कपडे अन् चपला, तिघांचा दुर्दैवी अंत


प्रशासक न्यूज,दि.३०ऑगस्ट

गावालगतच्या मुरुमाच्या खाणीत पोहायला गेलेल्या तीन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील अत्री येथे घडली आहे. पोलीस आणि गावकऱ्यांच्या मदतीने तिघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

प्रणय योगिराज मेश्राम (17), संकेत बालक रंगारी (17) आणि साहिल नरेश रामटेके (19) रा. अत्री ता. पवनी अशी मृतांची नावं आहेत. तिघेही मित्र असून दुपारी ते बाहेर गेले होते, मात्र सायंकाळपर्यंत घरी परत आले नाही. यानंतर त्यांचा शोध सुरू झाला. यावेळी गावाजवळ असलेल्या मुरूमाच्या खाणीजवळ कपडे आणि चप्पला पडून असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे गावकऱ्यांनी तिकडे धाव घेतली.

या घटनेची माहिती अड्याळ पोलिसांना देण्यात आली. अत्रीचे पोलीस पाटील आणि गावकऱ्यांनी शोधमोहीम सुरू केली. तासभरानंतर तिघांचेही मृतदेह खाणीत आढळून आले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अड्याळ येथे रवाना केले आहेत.
सगळीकडे शोधलं पण सापडले नाहीत; शेवटी मुरूमाच्या खाणीजवळ आढळले कपडे अन् चपला, तिघांचा दुर्दैवी अंत सगळीकडे शोधलं पण सापडले नाहीत; शेवटी मुरूमाच्या खाणीजवळ आढळले कपडे अन् चपला, तिघांचा दुर्दैवी अंत Reviewed by Prashasak on ऑगस्ट २९, २०२२ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.