दिंडोरी-तांदूळवाडीनंतर श्रीगोंद्यातही दुर्घटनेची भीती...मोठी दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे जरुरी...


प्रशासक न्यूज,दि.१५जून२०२६

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे काही दिवसांपूर्वीच एक कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या विहिरीत पडून ९ जणांना जीव गमवावा लागला होता त्याच घटनेची पुनरावृत्ती काल सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात घडली आहे
 तांदूळवाडी येथे एक पीकअप रस्त्याच्या बाजूला असलेल्या विहिरीत कोसळून ९ जणांना नाहक आपला जीव गमवावा लागला या घटनेतून आता तरी प्रशासनाने बोध घेणे जरुरी आहे घटना घडून गेल्यावर त्यावर चर्चा करण्या पेक्षा अशा घटना घडूच नये यासाठी अश्या प्रकारे रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या धोकेदायक विहिरीबाबत कडक कारवाई करणे जरुरी आहे सुरक्षेच्या उपाययोजना करण्यासाठी विहीर मालकांना सूचित करणे जरुरी आहे

श्रीगोंदा तालुक्यात सुद्धा अश्याच प्रकारे दिंडोरी किंवा तांदूळवाडी सारख्या दुर्दैवी घटनेची पुनरावृत्ती होण्याची दाट शक्यता आहे

लोणीव्यंकनाथ ते बेलवंडी रस्त्यावर अश्याच प्रकारे रस्त्याला लागून एक विहीर आहे या विहिरीला कुठलीही संरक्षक भिंत किंवा कठडा नाही त्यामुळे दिवसा अथवा रात्रीच्या वेळेस एखादे वाहन या विहिरीत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही रस्त्याला खेटून असलेल्या या विहिरीमुळे एखाद्या निष्पाप व्यक्तीला आपला जीव गमवावा लागू नये यासाठी श्रीगोंदा प्रशासनाने आता तरी या घटनेची गंभीर दखल घेत विहीर मालकाला विहिरी भोवती संरक्षक भिंत अथवा कठडा बांधण्याबाबत सूचना करणे जरुरी आहे या प्रकाराची गंभीर्याने दखल घेऊन विहीर मालकाला सूचित करणे गरजेचे आहे
प्रशासनाने रस्त्याच्या एकदम बाजूला असलेल्या विहिरीच्या बाजूने सुरक्षेच्या उपाययोजना करण्याबाबत तात्काळ उपाययोजना करणे जरुरी आहे
प्रशासनाने या गोष्टीकडे डोळेझाक केल्यास अथवा तातडीने याबाबत योग्य पाऊल न उचलल्यास या ठिकाणी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही






दिंडोरी-तांदूळवाडीनंतर श्रीगोंद्यातही दुर्घटनेची भीती...मोठी दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे जरुरी... दिंडोरी-तांदूळवाडीनंतर श्रीगोंद्यातही दुर्घटनेची भीती...मोठी दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे जरुरी... Reviewed by Prashasak on जून १५, २०२६ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.