प्रशासक न्यूज,दि.१५जून२०२६
स्थानिक गुन्हे शाखेने काल सायंकाळी श्रीगोंदा शहरानजीक पेडगाव रस्त्यावर कारवाई करत एका शेतातील गोदामात साठवून ठेवलेला लाखो रुपयांचा गुटख्याचा मुद्देमाल जप्त केला परंतु या जप्त केलेल्या मुद्देमाला च्या गोण्यांवर लाल अक्षरात सी आर नंबर ४६३/२६ अशी नोंद आढळून आल्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस देखील चक्रावून गेले
पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यांची जी नोंद केली जाते त्याला गुन्हा रजिस्टर नंबर अर्थात सी आर नंबर म्हंटले जाते तसाच उल्लेख स्थानिक गुन्हे शाखेने काल पकडलेल्या गुटख्याच्या गोण्यांवर मिळून आला आहे त्यामुळे आता एकच खलबळ उडाली आहे
विशेष म्हणजे नुकतीच काही दिवसांपूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या आदेशानुसार बेलवंडी पोलिसांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करत लाखो रुपयांचा गुटखा जप्त केला होता जप्त केलेला गुटखा बेलवंडी पोलिसांनी तत्कालीन पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या पोलीस कारकून कडे जमा केला होता
त्या गुटखा कारवाई प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात सी आर नंबर ४६३/२६ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता आता तोच गुन्हा नोंद क्रमांक काल स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केलेल्या गोण्यांवर लाल अक्षरात लिहिल्याचे मिळून आल्यामुळे पोलिसांच्या विश्वासार्हतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे
*चौकशीत धक्कादायक खुलासा,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीसही चक्रावले...चर्चांना उधाण *
स्थानिक गुन्हे शाखेने काल कारवाई केल्यानंतर सदर आरोपीकडे या गुटख्याच्या मुद्देमाला बाबत चौकशी केली असता त्याने तत्कालीन एक पोलीस अधिकारी आणि एका कर्मचाऱ्याने च हा गुटखा आपल्याला दिल्याचे सांगितल्याबाबत मोठ्या चर्चा कालपासून रंगत आहेत गुटखा विक्री करणाऱ्या व्यक्तीनेच अश्या प्रकारे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्याचे नाव घेतल्यामुळे पुन्हा एकदा अवैध व्यवसायिक आणि पोलिसांचे असलेले हितसंबंध चर्चेत आले आहेत
*पोलिसांच्या ताब्यातील मुद्देमाल परत गुटखा विक्रेत्याकडे गेला कसा?*
काल पकडलेल्या गुटख्या च्या गोण्यांवर लाल अक्षरात लिहिलेला सी आर क्रमांक आणि गुटख्याच्याच गुन्ह्यात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा रजिस्टर क्रमांक हा एकच असल्यामुळे आता मोठी खळबळ उडाली आहे काल गुटखा विक्रेत्याकडे पकडलेला मुद्देमाल हा या आधी बेलवंडी पोलिसांनी कारवाई केलेलाच मुद्देमाल आहे का?असेल तर तो मुद्देमाल श्रीगोंदा पोलिसांच्या ताब्यात होता मग गुटखा विक्रेत्याच्या गोदामात पोहोचला कसा?की पोलिसांनीच तो गुटखा पुन्हा विक्रेत्याला दिला?बेलवंडी पोलिसांनी ज्या गुटख्या विक्रेत्याचा मुद्देमाल पकडला होता काल पुन्हा त्याच विक्रेत्याकडे त्याच गुन्ह्यांची नोंद असलेल्या गोण्यांमध्ये हा मुद्देमाल कसा मिळून येतो नक्कीच हा योगायोग तर नाही मग पोलिसांच्या ताब्यात असलेला मुद्देमाल कुणाच्या परवानगीने पुन्हा विक्रीसाठी बाहेर गेला? असे एक ना अनेक सवाल आता उपस्थित झाले आहेत
*चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई होणार...पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन*
सदर प्रकाराबाबत पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या प्रकरणाची गंभीर्याने दखल घेत संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई केली जाईल असे सांगितले आहे
*बळीचा बकरा न करता मुख्य दोषी असलेल्या व्यक्तीवर कारवाई होणे जरुरी*
सदर प्रकरणामुळे पोलीसांच्या कार्यपद्धतीवर संशय निर्माण झाला आहे कालच्या गुटखा प्रकरणामुळे पोलीस दलात देखील एकच खळबळ उडाली आहे त्यामुळे आता सदर प्रकरणा
तून सुटण्यासाठी एखाद्या कर्मचाऱ्याला बळीचा बकरा बनवला जाण्याची शक्यता आहे तसेच या प्रकरणातून निसटण्यासाठी दोषींकडून कायद्यातील काही पळवाटा शोधून चुका दुरुस्त करण्याचा आटोकाट प्रयत्न केला जाण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची तात्काळ चौकशी होऊन दोषी असणाऱ्या जबाबदार व्यक्तीवर कारवाई होणे जरुरी आहे जेणेकरून भविष्यात पुन्हा असे प्रकार करण्याची कुणाची हिंमत होणार नाही
सदर प्रकरणात पोलीस अधीक्षक कुणावर आणि काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
'पोलिसांच्या' ताब्यातील मुद्देमाल पुन्हा विक्रेत्याकडे?...सी आर नंबर मुळे उडाली खळबळ..
Reviewed by Prashasak
on
जून १५, २०२६
Rating:
Reviewed by Prashasak
on
जून १५, २०२६
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: