तत्कालीन पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्यासह कर्मचाऱ्यावर गंभीर आरोप.... गुन्हा दाखल करण्याची मागणी!कारवाई न झाल्यास आंदोलनाचा ईशारा...


प्रशासक न्यूज,१६जून२०२६

श्रीगोंदा पोलिसांच्या ताब्यातील मुद्देमाल परत विक्रेत्याकडे मिळून आल्याने गुटखा प्रकरण चांगलेच तापले असून या प्रकरणात श्रीगोंद्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्यासह त्यांच्या कर्मचाऱ्यांवर सामाजिक कार्यकर्ते टिळक भोस यांनी अतिशय गंभीर आरोप केले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करत निलंबनाची कारवाई करण्याची मागणी भोस यांनी थेट पोलीस महासंचालक पोलीस महानिरीक्षक आणि पोलीस अधीक्षक यांना लिहिलेल्या अर्जात केली आहे

श्रीगोंद्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक किरण शिंदे आणि त्यांच्या इतर कर्मचाऱ्यांनी गुन्हा रजिस्टर नंबर सी आर ४६३/२६ दि.१५ मे २०२६ ला दाखल असलेल्या गुन्ह्यातील जप्त केलेल्या मुद्देमालातील गुटखा चोरून पुन्हा गुटखा विक्री करणाऱ्या व्यक्तीस विकल्याचा गंभीर आरोप भोस यांनी सदर अर्जात केला आहे त्या घटनेमुळे पोलीस खात्याची प्रतिमा मलीन झाली असून लोकांचा पोलीस खात्यावरील विश्वास उडाला आहे त्यामुळे पोलीस निरीक्षक किरण शिंदे व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यावर चोरीचा गुन्हा दाखल करून मुद्देमाल नष्ट करणे व तस्करीस मदत केल्या प्रकरणी त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि स्वराज्य जनजागृती परिषद अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस यांनी थेट राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे केली आहे

त्यांनी सोशल मीडियावर त्याबाबतचा अर्ज प्रसिद्ध केला असून त्यांनी या गुटखा प्रकरणात विभागीय चौकशी करून संबंधित प्रकरणात दोषी अधिकारी मुद्देमाल शाखेतील अधिकारी आणि जबाबदार कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे

त्यांनी अर्जात म्हंटले आहे की याआधी सुद्धा अहिल्यानगर पोलीस अधीक्षक कार्यालयातून करोडो रुपयांचे ड्रग्स विकले गेले होते त्यामुळे एखाद्या कारवाईत जप्त केलेला मुद्देमाल चोरून विकणे हा काही पोलिसांचा गोरख धंदा बनला आहे

१५ मे २०२६ रोजी बेलवंडी पोलिसांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्या हद्दीत छापा टाकून ४लाख ६० हजार रुपयांचा गुटख्याचा मुद्देमाल पकडून तो जप्त केला होता त्या बाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात सी आर नंबर ४६३/२६ या क्रमांकाने
गुन्हा दाखल झाला होता
१४ जून २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेने श्रीगोंद्यात छापा टाकून जो गुटखा पकडला त्यावर त्यावर ४६३/२६ असा स्पष्ट उल्लेख आहे त्यामुळे पहिल्या गुन्ह्यात जप्त केलेला गुटख्याचा मुद्देमाल पुन्हा बाजारात आला कसा?याबाबत गंभीर संशय निर्माण झाला आहे
विशेष म्हणजे एखाद्या गुन्ह्यात जप्त केलेला मुद्देमाल सुरक्षित ठेवणे ही संबंधित अधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांची जबाबदारी आहे असे असताना सुद्धा जप्त मुद्देमाल पुन्हा बाजारात मिळून येणे ही अतिशय गंभीर,संशयास्पद आणि निष्काळजीपणाची बाब आहे या प्रकरणात पोलीस निरीक्षक किरण शिंदे आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या संगनमताची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे या संपूर्ण प्रकाराची निष्पक्ष चौकशी होऊन दोषींवर निलंबनाची कारवाई तसेच गुटखा चोरीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी टिळक भोस यांनी अर्जाद्वारे पोलीस महासंचालक यांच्याकडे केली असून संबंधित प्रकरणात दोषी पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्यावर कारवाई न झाल्यास मुंबई येथे आझाद मैदानावर २६ जून पासून आंदोलन छेडण्याचा इशारा देखील भोस यांनी अर्जात दिला आहे
त्यामुळे श्रीगोंद्यातील गुटखा प्रकरण चांगलेच तापले असून दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर खरच कारवाई होणार की फक्त एखाद्या कर्मचाऱ्यावर खापर फोडून पोलीस अधिकाऱ्यांचा बचाव केला जाणार हे येत्या काही दिवसातच समजणार आहे

या प्रकरणात आता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे




तत्कालीन पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्यासह कर्मचाऱ्यावर गंभीर आरोप.... गुन्हा दाखल करण्याची मागणी!कारवाई न झाल्यास आंदोलनाचा ईशारा... तत्कालीन पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्यासह कर्मचाऱ्यावर गंभीर आरोप.... गुन्हा दाखल करण्याची मागणी!कारवाई न झाल्यास आंदोलनाचा ईशारा... Reviewed by Prashasak on जून १६, २०२६ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.