श्रीगोंद्यात राजकारणासाठी "हनीट्रॅप" चा वापर....खंडणी देण्यास नकार आणि निकडणुका डोळ्यासमोर ठेवून गुन्हा दाखल झाल्याचा आरोप... तक्रारदारांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल!


प्रशासक न्यूज,दि.४ऑक्टोबर२०२५

श्रीगोंदा नगरपरिषदेचे माजी नगरसेवक सुनील वाळके यांच्या विरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात काल आत्याचार केल्याप्रकरणी एका महिलेने गुन्हा दाखल केला होता वाळके यांच्या पत्नी मनीषा यांच्या विरोधात देखील या महिलेने काल गुन्हा नोंदवला होता माजी नगरसेवक पती पत्नी विरोधात अश्या प्रकारे गुन्हा दाखल झाल्यानंतर काल शहरात एकच खळबळ उडाली होती तक्रारदार महिला व तिच्या कुटुंबंयांनी २० लाख रुपयांची खंडणी मागितली होती व ती देण्यास सुनील वाळके यांनी नकार दिल्यामुळे आणि श्रीगोंदा नगरपरिषदेची होऊ घातलेली निवडणुक यातून राजकीय सुडबुद्धीने प्रेरित होऊन हा गुन्हा नोंदवण्यात आल्याचा आरोप सुनील वाळके यांचे पुतणे सचिन यांनी केला असून सचिन यांनी आता तक्रार देणारी पीडित महिला तीचा पती व घरातील पाच लोकांनविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केल्यामुळे या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे

श्रीगोंदा शहरात गेल्या दोन दिवसांपासून माजी नगरसेवक सुनील वाळके यांच्या विरोधात खोटा गुन्हा नोंद करून बदनामी चालू आहे मात्र या घटनेतील सत्यता वेगळीच असल्याचे समोर येत आहे . काल रात्री सुनील वाळके यांचे पुतणे सचिन वाळके यांनी श्रीगोंदा पोलीसात पाच जणांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केल्यामुळे आता या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे सचिन वाळके यांच्या म्हणण्यानुसार हा गुन्हा राजकिय हेतूने प्रेरित होऊन दाखल केला आहे. वाळके पती पत्नी यांच्या विरोधात ज्यांनी गुन्हा दाखल केला त्या संबधित फिर्यादी यांनी मोठ्या रकमेची मागणी वाळके यांच्याकडे केली होती व त्याची पूर्तता केली नाही म्हणून हा गुन्हा दाखल केला असल्याचे सचिन वाळके यांचे म्हणणे आहे . याबाबत सचिन वाळके यांनी प्रसिद्धी पत्रक काढून माहिती दिली आहे

याबाबत अधिक माहिती अशी की, माजी नगरसेवक सुनील वाळके हे आगामी नगरपालिका निवडणुकीमध्ये सत्ताधारी पक्षाकडून उमेदवारी करण्यासाठी इच्छुक असून सुनील वाळके यांचा स्वतच्या प्रभागात व शहरात मोठा जनसंपर्क आहे अनेक विकासात्मक कामासाठी सुनील वाळके हे सक्रिय असतात त्यामुळे हे नगराध्यक्ष पदासाठी वाळके हे प्रबळ दावेदर असणार हे विरोधकांनी गृहीत धरले होते म्हणून वाळके यांची बदनामी करण्यासाठी निवडणुका जाहीर होण्याच्या एक दिवस आधी गुन्हा दाखल करून वाळके यांच्या बदनामीचे हे कुभांड रचल्याचा आरोप सचिन वाळके यांनी केला आहे

दि २० ऑक्टोबर २०२५ रोजी संबधित महिलेचा पती हा सुनील वाळके यांच्याकडे आला व तुझ्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करणार आहे जर गुन्हा दाखल करायचा नसेल तर मला आता पाच लाख रुपये दे नाहीतर सोशल मिडियावर तुझी बदनामी करेल अशी धमकी दिली होती त्यामुळे आपण स्वतः ऑक्टोबर च्या शेवटच्या आठवड्यात रोख स्वरूपात पाच लाख रु.संबंधित व्यक्तीकडे दिल्याचे प्रसिद्धी पत्रकात सांगितले आहे

त्यानंतर सुनील वाळके यांच्या विरोधात तक्रार देणाऱ्या संबधित महिलेच्या घरातील पाच व्यक्ति दि २ नोव्हेंबर २०२५ रोजी एकत्रित येऊन वाळके यांच्या घरी आल्या व आम्हाला आणखी २० लाख रुपये द्या अन्यथा आम्ही गुन्हा दाखल करू अशी धमकी त्यांनी दिली. आपल्याला फसविले जात आहे हे माझे चुलते सुनील वाळके यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पैसे देण्यास नकार दिला.त्यामुळे राजकिय हेतु समोर ठेवून बदनाम करण्यासाठी हे खोट्या गुन्ह्यांचे कुभांड रचले गेल्याचा आरोप सचिन वाळके यांनी केला आहे

याबाबत सचिन वाळके यांनी श्रीगोंदा पोलीसात संबधित व्यक्ति व त्याच्या कुटुंबातील व्यक्ति विरोधात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी सचिन वाळके यांनी केली आहे .

श्रीगोंद्यातील राजकारण या आधी कधीही एवढ्या खालच्या पातळीवर गेले नव्हते अशी शहरात दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.

फक्त आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून बदनामी
माजी नगरसेवक सुनिल वाळके यांचे राजकारणातील व समाजकारणातील प्रस्थ शहरात वाढत असल्याने आपला याच्या समोर निभाव लागणार नाही हे लक्षात आल्याने विरोधकांनी असे खोटे गुन्हे दाखल करून बदनामी करण्याचे षडयंत्र केले आहे . अशी प्रतिक्रिया सुनील वाळके यांचे पुतणे सचिन वाळके यांनी दिली आहे
श्रीगोंद्यात राजकारणासाठी "हनीट्रॅप" चा वापर....खंडणी देण्यास नकार आणि निकडणुका डोळ्यासमोर ठेवून गुन्हा दाखल झाल्याचा आरोप... तक्रारदारांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल! श्रीगोंद्यात राजकारणासाठी "हनीट्रॅप" चा वापर....खंडणी देण्यास नकार आणि निकडणुका डोळ्यासमोर ठेवून गुन्हा दाखल झाल्याचा आरोप... तक्रारदारांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल! Reviewed by Prashasak on नोव्हेंबर ०४, २०२५ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.