"अपघातात" तरुणाचा दुर्दैवी मृत्यू... श्रीगोंद्यातील घटना!


प्रशासक न्यूज, दि.५नोव्हेंबर २०२५

रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यातील खडीवरून दुचाकी घसरून झालेल्या अपघातात पेडगाव येथील निलेश ज्ञानदेव क्षीरसागर वय.३५वर्षे या तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज श्रीगोंदा शहरातील पेडगाव रस्त्यावरील जलसंपदा विभागाच्या(कुकडी) कार्यलया जवळ दुपारी तीन ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे

या घटनेबाबत प्रत्यक्षदर्शीकडून मिळालेली माहिती अशी कि आज दुपारी सदर मयत तरुण हा श्रीगोंद्यातून पेडगावच्या दिशेने दुचाकीवरून जात असताना कुकडी कार्यालयाच्या समोर रत्यावर खुड्डे पडले असून त्या खड्ड्यातील खडी आणि कच रस्त्यावर पसरली आहे या खडीवरून या तरुणाची दुचाकी घसरली आणि पुढे सायकल वर जात असलेल्या राऊत नामक एका वयोवृद्ध व्यक्तीला या दुचाकीने धडक दिली या अपघातात तरूणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली त्यामुळे त्यांना उपचारासाठी अहिल्यानगर ला घेऊन जात असताना रस्त्यातच त्या तरुणाचा मृत्यू झाला तर दुचाकी सायकल ला पाठीमागून धडकल्यामुळे सायकल वर जाणारे राऊत हे किरकोळ जखमी झाले आहेत

अपघाताची माहिती समजल्यानंतर स्थानिक नागरिकांसह पेडगाव येथील कार्यकर्ते गणेश झिटे यांनी या तरुणाला उपचारासाठी दवाखान्यात नेले परंतु रस्त्यातच तरुणाचा मृत्यू झाला

अपघातात मयत झालेला तरुण हा सलून व्यावसायिक असून त्याचा पेडगाव येथे सलुनचा व्यवसाय आहे

अश्या प्रकारे रस्त्यावरील खड्ड्याने एका निष्पाप तरुणाचा बळी घेतल्यामुळे नागरिकांमधून प्रशासनाच्या कामकाजा बाबत संताप व्यक्त होत असून शहरातील रस्त्यानवरील खड्डे बुजवण्याची मागणी होत आहे काही भागातील रस्त्यावरील खड्डे् काही दिवसांपूर्वी बुजवण्यात आले होते पण ते काम निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे काही दिवसांच्या आतच पुन्हा रस्त्याना खड्डे पडल्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे

"अपघातात" तरुणाचा दुर्दैवी मृत्यू... श्रीगोंद्यातील घटना! "अपघातात" तरुणाचा दुर्दैवी मृत्यू... श्रीगोंद्यातील घटना! Reviewed by Prashasak on नोव्हेंबर ०५, २०२५ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.