प्रशासक न्यूज,दि.७नोव्हेंबर २०२५
विशाल अ चव्हाण
कधी होणार कधी होणार असे म्हणत असतानाच अखेर श्रीगोंदा नगरपरिषदेसाठी २डिसेंबर रोजी मतदान होणार हे निश्चित झाले आहे निवडणुकीचा बिगुल वाजला आहे ऐन थंडीत राजकीय माहोल गरम होणार आहे निवडणुकीचा मुहूर्त निश्चित झालाय नेत्यांच्या बैठकांचा धडाका रोजच सुरु आहे पण नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारी बाबत असलेला सस्पेंन्स अद्यापही कायमच आहे मतदानासाठी अवघे २५ दिवस बाकी आहेत दोन दिवसात उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होत आहे असे असले तरी कोणत्या पक्षाकडून कोणता उमेदवार नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवणार याबाबतचा घोळ काही संपायला तयार नाही
मनोहर पोटे उमेदवारी साठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असले तरी कुठल्या पक्षाकडून ते उमेदवारी करणार हे अजून तळ्यात मळ्यातच आहे
२०१९साली भाजपकडून अर्थात पाचपुते यांच्याकडून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळणार नसल्याचे लक्षात आल्यावर मनोहर पोटे यांनी बाबासाहेब भोस यांच्या मदतीने निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस मध्ये प्रवेश करत काँग्रेसच्या तिकिटावर पत्नी शुभांगी पोटे यांना निवडणूक मैदानात उतरवले होते त्यात पोटे यांचा विजय झाला होता परंतु यावेळी पोटे विरोधकांची संख्या प्रचंड मोठी आहे राष्ट्रवादी अजित पवार गटातील काही नेते पोटे यांच्या उमेदवारीसाठी आग्रही असले तरी कार्यकर्ते आणि इतर नेते यांचा पोटे यांच्या नावाला मोठा विरोध आहे त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गट कुणाला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देणार याकडे देखील सर्वांचे लक्ष लागून आहे
*पाचपुते विरोधकांमध्ये फूट*
सुरुवातीला ही निवडणूक पाचपुते विरुद्ध सर्व पाचपुते विरोधी सर्व नेते अशी होईल असे वाटतं असतानाच आता नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवरून नेत्यांन मध्येच एकमत होत नसल्याचे चित्र आहे पोटे यांच्या नावासाठी माजी आमदार राहुल जगताप हे आग्रही असले तरी राजेंद्र नागवडे हे काही कारणास्तव पोटे यांच्या नावाला विरोध दर्शवत आहेत तर घनश्याम शेलार हे स्वतःच निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत त्यामुळे पोटे यांच्या नावावर सध्या तरी राष्ट्रवादीत एकमत होत नसल्याचेच चित्र आहे त्यातच जेष्ठ नेते आणि मागच्या वेळी मनोहर पोटे यांच्या पत्नी शुभांगी पोटे यांना काँग्रेसची उमेदवारी मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलणारे बाबासाहेब भोस यांनी महाविकास आघाडीचे सूत्र हातात घेतले आहेत पोटे यांची कोंडी करण्यासाठी आता ते आपल्या सुनबाई सौ गौरी गणेश भोस यांना निवडणूक मैदानात उतरवणार आहेत त्यामुळे नगरपरिषद निवडणुकीत पाचपुते यांना खिंडीत गाठण्यासाठी एकत्र आलेल्या नेत्यांमध्येच सध्या एकमत नसल्याचे दिसत आहे तर बाबासाहेब भोस हे सवता सुभा उभा करण्याच्या तयारीत आहेत त्यामुळे सध्यातरी पाचपुते विरोधकांमध्ये फूट पडल्याचेच चित्र दिसत आहे
*भोस यांच्याकडून दबाव तंत्राचा वापर?*
स्वतःच्या सुनबाईना मैदानात उतरवण्याचा निर्णय म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून मनोहर पोटे यांना उमेदवारी मिळू न देण्यासाठी भोस यांचे हे राष्ट्रवादी च्या नेत्यांवर वापरले जाणारे दबाव तंत्र तर नाही ना अशीही दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे त्यातच भोस यांना साजन पाचपुते यांची आता साथ भेटल्यामुळे मनोहर पोटे यांची अडचण वाढली आहे
भोस हे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांवर दबाव टाकून ऐनवेळी स्वतःच्या सुनबाई गौरी भोस यांच्यासाठी राष्ट्रवादी(अजित पवार गटाची)उमेदवारी पदरात पाडून घेण्याची शक्यता नाकारता येत नाही असे झाले तर भोस हे एका दगडात दोन पक्षी मारण्यात यशस्वी ठरणार आहेत
*विरोधकांची फूट आणि एकापेक्षा जास्त प्यानेल झाल्यास पाचपुते यांच्या पथ्यावर पडणार*
शहरात आजतरी पाचपुते कुटुंबाची ताकद मोठी आहे माजी मंत्री बबनराव पाचपुते यांना मानणारा वर्ग मोठा आहे पाचपुते कुटूंबाला खिंडीत गाठण्यासाठी पाचपुते विरोधकांना एकीची मोट बांधणे गरजेचे आहे त्यात बाबासाहेब भोस हे जेष्ठ नेते असल्यामुळे आणि शहरातील स्थानिक नेते असल्यामुळे त्यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे
*राष्ट्रवादी च्या उमेदवारी च्या भात्यात फक्त एकच नाव*
पाचपुते विरोधी नेते अर्थात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते भाजप विरोधात किंवा पाचपुते यांना कोंडीत पकडण्यासाठी आता पर्यत फक्त आणि फक्त मनोहर पोटे एवढ्या एकाच नावावर आपली ताकद लावत होते पोटे रुपी कार्ड वापरून पाचपुतेची अडचण करण्याचा डाव टाकण्याच्या तयारीत सर्व नेते असतानाच पोटे यांच्या नावाला त्यांच्याच गोटातून मोठा विरोध वाढल्यामुळे नेत्यांचीच आता मोठी गोची झाली आहे मुंबईत झालेल्या आढावा बैठकीत राष्ट्रवादी कडून पोटे वगळता इतर पाच जणांची यादी पक्ष नेतृत्वाकडे दिली गेली असली तरी उमेदवारी चा निर्णय स्थानिक नेतेच घेणार आहेत पण आता आंतर्गत विरोधामुळे त्यांच्या पुढे नगरध्यक्ष पदाच्या उमेदवाराची मोठी समस्या निर्माण झाली आहे
*भाजपच्या गोटात सस्पेन्स कि आमदारांची ही राजकीय खेळी*
विरोधक पाचपुतेच्या विरोधात मनोहर पोटे यांचे कार्ड वापरणार हे जवळपास निश्चित होते मनोहर पोटे किंवा शुभांगी पोटे निवडणूक लढवणारच हे निश्चित आहे त्या विरुद्ध परिस्थिती आज शहरात ताकद असणाऱ्या भाजप पक्षात पहायला मिळत आहे मतदानाला अवघे २५ दिवस उरलेले असताना सुद्धा पाचपुते गटात म्हणजेच भाजपात अजूनही मोठी शांतता पहायला मिळत आहे कदाचित ही वादळा पूर्वीची शांतता असल्याचे देखील बोलले जात असून उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापार्यत आ विक्रम पाचपुते हे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारी बाबत सस्पेन्स कायम ठेवून शेवटच्या दिवशी धक्कातंत्र वापरून एकदम स्ट्रॉंग उमेदवार भाजप कडून मैदानात उतरवतील असे सर्वांना वाटतं आहे उमेदवारी जाहीर न करण्यामागे पाचपुते यांची एक राजकीय खेळी आणि आ विक्रम पाचपुते यांच्या संयमी राजकारणाचाच हा एक भाग असल्याचे सध्या तरी दिसत आहे
*महाविकास आघाडीबाबत साशंकता*
श्रीगोंद्यात महाविकास आघाडीकडे साजन पाचपुते,खा निलेश लंके, श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगले, जेष्ठ नेते बाबासाहेब भोस अशी तगडी नेते मंडळी आहेत महाविकास आघाडीला मानणारा मोठा वर्ग श्रीगोंद्यात आहे पाचपुते विरोधी सर्वच नेते राष्ट्रवादी मध्ये गेल्यामुळे महाविकास आघाडीला सहानुभूती मिळणार आहे त्यामुळे महाविकास आघाडीने प्यानेल करून जर उमेदवार मैदानात उतरवले तर या निवडणुकीत मोठी रंगत येणार आहे परंतु मतदान अवघ्या २५ दिवसांवर येऊन सुद्धा महाविकास आघाडीचे बाबासाहेब भोस सोडता इतर नेते अद्यापही शांतच दिसत आहेत त्यातच पाचपुते यांना खिंडीत गाठण्यासाठी जर राष्ट्रवादी च्या नेत्यांना बाबासाहेब भोस यांच्याच सुनबाईना उमेदवारी दिलीच तर मात्र महाविकास आघाडीचे भवि्तव्य अधांतरीच असणार आहे
*सध्या तरी एकच उमेदवार रिंगणात*
श्रीगोंद्यात नगराध्यक्ष पदासाठी सध्या तरी मनोहर पोटे हे एकमेव उमेदवार निवडणूक रिंगणात उतरल्याचे दिसत आहे त्यांना राष्ट्रवादी च्या उमेदवारीत डावलण्यात आले तरी ते शिवसेना शिंदे गटाचा स्वतंत्र प्यानेल तयार करून निवडणुकीच्या मैदानात उतरणारच हे ठरलेले आहे त्यामुळे आजतरी पोटे यांच्या विरोधात कोण असा प्रश्न नेते आणि सामान्य नागरिकांना पडलेला आहे
त्यामुळे निवडणुकीचा मुहूर्त ठरलेला असताना उमेदवारीचाच घोळ अजून संपत नसल्यामुळे श्रीगोंद्यात नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारी बाबत मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे

मुहूर्त ठरला....बैठकांचा धडाका... पण तरीही उमेदवारी बाबत सस्पेंन्स कायम
Reviewed by Prashasak
on
नोव्हेंबर ०७, २०२५
Rating:
Reviewed by Prashasak
on
नोव्हेंबर ०७, २०२५
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: