"नको" तो माणूस नगराध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून....आमदार,खासदारांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीने "रणशिंग"फुंकले
प्रशासक न्यूज,दि.१०नोव्हेंबर २०२५
श्रीगोंदा नगरपरिषद निवडणूक महाविकास आघाडीतील काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार गट),शिवसेना ठाकरे गट हे तिन्ही पक्ष एकजुटीने आणि पूर्ण ताकतीने लढवणार असल्याची घोषणा आज महाविकास आघाडीने श्रीगोंदा शहरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली तसेच कुठल्याही परिस्थितीत माघार घेणार नसल्याचे सांगत महाविकास आघाडीने आता शड्डू ठोकले आहेत त्यामुळे श्रीगोंदा नगरपरिषद निवडणुकीत मोठी रंगत आली आहे तसेच महाविकास आघाडीचे नेते म्यानेज होतील माघार घेतील असे आरोप विरोधक करत होते त्या टिकेला सुद्धा आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उत्तर दिले आहे
या पत्रकार परिषदेसाठी खासदार निलेश लंके,आमदार हेमंत ओगले, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष दादाभाऊ कळमकर,शिवसेना उपनेते साजन पाचपुते,जेष्ठ नेते बाबासाहेब भोस,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के, शिवसेना तालुकाध्यक्ष विजय शेंडे,प्रशांत ओगले,गणेश भोस,संतोष खेतमाळीस, ऍड सुमित बोरुडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते
प्रशांत ओगले, साजन पाचपुते आणि बाबासाहेब भोस या तिघांवर महाविकास आघाडीची पूर्ण जबादारी असणार आहे
*अध्यक्षपदासाठी नको तो उमेदवार त्यामुळे सोबत जाणार नाही*
समविचारी लोकांना सोबत घेऊन ही निवडणूक लढवण्याची आमची मानसिकता होती त्या दृष्टीने आम्ही राष्ट्रवादी अजित पवार गटाशी चर्चा केली होती परंतु त्यांच्याकडे नको तो माणूस अध्यक्षपदाची उमेदवारी करणार असल्यामुळे आम्ही त्यांच्या सोबत न जाण्याचा निर्णय घेतल्याचे भोस यांनी सांगितले त्यामुळे भोस यांनी मनोहर पोटे यांचे थेट नाव घेतले नसले तरी त्यांच्या उमेदवारीवर असलेला आक्षेप त्यांनी बोलून दाखवला तसेच अजित पवार गट राष्ट्रवादी कडून मनोहर पोटे हेच उमेदवार असल्याचे अप्रत्यक्ष संकेत भोस यांनी दिले तसेच आम्ही प्यानेल करणार नाही अशी अनेकांना शंका होती तसा संभ्रम जाणीवपूर्वक लोकांमध्ये पसरवला जात होता परंतु आज आम्ही नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाच्या २२ जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचे जाहीर घोषणा केल्यामुळे जनतेला आता विश्वास बसणार आहे असेही भोस यांनी सांगितले
ते असल्यास आम्हाला निवडणूक अजून सोपी...
नगर दक्षिणची निवडणुकीची जबाबदारी भाजपा ने माजी खा सुजय विखे यांच्यावर सोपवल्यामुळे पुन्हा लंके विरुद्ध विखे असा संघर्ष होणार का याबाबत पत्रकारांनी विचारले असता विखे असल्यावर आम्हाला निवडणूक जास्त सोपी जाते असा उपरोधीक टोला खासदार निलेश लंके यांनी विखेना लगावला सत्ताधारी पक्षाकडून या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात धनशक्तीचा वापर करण्यात येणार असल्याबाबत पत्रकारांनी विचारले असता निवडून येण्यासाठी आर्थिक ताकत लागत नाही जनतेचा पाठींबा लागतो असे ते म्हणाले नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोणत्या पक्षाचा असेल यावर त्यांनी महाविकास आघाडीचा नगराध्यक्ष होईल हे आमच्यासाठी महत्वाचे असल्याचे सांगत थेट उमेवारीवर भाष्य करणे टाळले तसेच शहरातील प्रश्न भविष्यातील शहराचा विकास या मुद्द्यानवर निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे लंके यांनी सांगितले
श्रीगोंद्यात आता परिवर्तन होणार असल्याचे सांगत निवडणूक पूर्ण ताकतीने लढणार असल्याचे श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगले यांनी स्पष्ट केले
शिवसेना नेते साजन पाचपुते यांनी श्रीगोंद्यात विरोधक महाविकास आघाडीची टिंगल करत होते त्यांना आम्ही प्यानेल उभा करून उत्तर देणार आहोत विधानसभेला विरोधात लढणारे आज राष्ट्रवादीत एकत्र येऊन मांडीला मांडी लावून बसले आहेत असे म्हणत त्यांनी नाव न घेता राहुल जगताप व राजेंद्र नागवडे यांच्यावर टीका केली तन,मन आणि धनाने ही निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले
यावेळी दादाभाऊ कळमकर यांनी श्रीगोंद्यात महाविकास आघाडीचाच नगराध्यक्ष होईल असा आत्मविश्वास व्यक्त केला हरिदास शिर्के यांनी प्रस्तावना केली
जागावाटपा बाबत भोस यांना विचारले असता प्रभागात मेरिट नुसार प्रत्येक पक्षाचा उमेदवार निवडला जाईल असे सांगताना महाविकास आघाडीकडे दोन ते तीन जण नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असल्याचे सांगत उमेदवारांचे नाव सांगणे मात्र त्यांनी टाळले तसेच १७तारखेला महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराची घोषणा करणार असल्याचे भोस यांनी सांगितले
"नको" तो माणूस नगराध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून....आमदार,खासदारांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीने "रणशिंग"फुंकले
Reviewed by Prashasak
on
नोव्हेंबर १०, २०२५
Rating:
Reviewed by Prashasak
on
नोव्हेंबर १०, २०२५
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: