प्रशासक न्यूज,दि.११नोव्हेंबर २०२५
श्रीगोंदा पोलीस ठाणे मागील काही दिवसांपासून सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहिले आहे आता श्रीगोंदा पोलीस ठाण्यातील कर्मचारीच तालुक्यातील अनेक अवैध व्यवसायात पार्टनर असल्याचा आरोप काष्टी येथील प्रतापराव जाधव यांनी केला असून याबाबत त्यांनी थेट पोलीस महानिरीक्षक व अहिल्यानगर पोलीस अधीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार केली असून सदर कर्मचाऱ्यावर येत्या दि.१४नोव्हेंबर पर्यत कारवाई न झाल्यास दि. १५नोव्हेंबर पासून नाशिक येथील विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा ईशारा जाधव यांनी अर्जाद्वारे दिला आहे
सदर अर्जात म्हंटल्याप्रमाणे श्रीगोंदा पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे पोलीस कर्मचारी संदीप राऊत यांची विविध अवैध व्यवसायात भागीदारी आहे,चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीसोबत त्यांचे आर्थिक संबंध आहेत वादग्रस्त जमिनीवर ताबेमारी करण्यासाठी विशिष्ट समुदायातील लोकांना हाताशी धरून जमिनीवर ताबेमारी करणे आर्थिक तडजोड करणे या माध्यमातून राऊत या कर्मचाऱ्याने लाखो रुपयांची आर्थिक माया जमा केल्याचा आरोप सदर अर्जात करण्यात आला आहे इन्फिनिटी बिकॉन(सिसपे)या आर्थिक फसवणूक करणाऱ्या कंपनीतील श्रीगोंद्यातील आरोपीकडून राऊत यांनी चौकशीच्या नावाखाली लाखो रुपयांची वसुली केली आहे सदर कर्मचाऱ्याने बेकायदेशीर रित्या गोळा केलेल्या मायेतून कल्याण रोड लगत आणि जामखेड येथे कुटुंबीय आणि नातेवाईकांच्या नावे मोठी मालमत्ता जमा केली असून त्याची चौकशी करण्याची मागणी जाधव यांनी अर्जाद्वारे केली आहे
राऊत यांचा तालुक्यातील गोवंश आणि अवैध वाळू व्यवसायात सहभागाचा गंभीर आरोप अर्जात करण्यात आला आहे
*पोलीस अधीक्षक काय कारवाई करणार याकडे लक्ष*
श्रीगोंदा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यावर एवढे गंभीर आरोप झाल्यावर आता पोलीस अधीक्षक घार्गे हे काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे या प्रकराबाबत घार्गे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही
एका कर्मचाऱ्यावर गंभीर आरोप होणे आणि कारवाईसाठी उपोषण करणे यामुळे श्रीगोंदा पोलीस स्टेशन पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे
पोलीस" कर्मचारी कि?....गंभीर आरोप...थेट पोलीस महानिरीक्षक,अधीक्षकांकडे तक्रार..
Reviewed by Prashasak
on
नोव्हेंबर १०, २०२५
Rating:
Reviewed by Prashasak
on
नोव्हेंबर १०, २०२५
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: