प्रशासक न्यूज,दि.११नोव्हेंबर२०२५
श्रीगोंदा नगरपरिषद निवडणूक अवघ्या २०दिवसांवर येऊन ठेपली आहे निवडणुका जाहीर होण्याआधी चालुवर्षी निवडणुकीसाठी इच्छुकांची असलेली मोठी संख्या लक्षात घेता या निवडणुकीत राजकीय माहोल तापणार अशी शक्यता वाटतं होती परंतु आता मतदानासाठी काही दिवस उरलेले असताना सुद्धा अजून नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाची उमेदवारी कुणाला मिळणार याबाबत अजूनही प्रचंड सस्पेन्स आहे
उमेदवारी अर्ज भरण्यास कालपासून सुरुवात झाली आहे तरी अजून सर्वच पक्षाचे उमेदवार गुलदस्त्यात आहे त्यामुळे कार्यकर्ते देखील मोठ्या संभ्रमात आहेत या सर्व घडामोडीमुळे श्रीगोंद्यातील राजकीय माहोल अद्यापही थंडच असल्याचे पाहायला मिळत आहे त्यामुळे अर्ज भरण्यासाठी अजून पाच दिवस बाकी राहिलेले असताना उमेदवार नेमके कधी जाहीर होणार याकडे श्रीगोंद्यातील मतदारांचे लक्ष लागले आहे
कोणता झेंडा घेऊ हाती...
श्रीगोंद्यातील आजची राजकीय परिस्थिती पाहता सर्वच पक्षाचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत काही कार्यकर्ते तर उमेदवारी भेटेल कि नाही या साशंकतेने सर्वच पक्षांकडे उमेदवारीसाठी उंबरे झीझवताना पाहायला मिळत आहेत तर बदललेल्या प्रभाग रचनेमुळे काही कार्यकर्त्यांना कोणत्या पक्षाकडून आणि कोणत्या प्रभागातून उमेदवारी करावी याबाबतचा निर्णय अद्याप घेता येत नसल्यामुळे श्रीगोंद्यातील कार्यकर्त्यांवर कोणता झेंडा घेऊ हाती अशी म्हणण्याची सध्या वेळ आली आहे
आमदारांच्या निवासस्थानी बैठकांचा जोर.. कार्यकर्त्यांची मोठी रेलचेल.. विरोधी गटात मात्र शांतता...
आमदार विक्रम पाचपुते यांच्या श्रीगोंद्यात असलेल्या माऊली निवासस्थानी निवडणुकी च्या पार्श्वभूमीवर सतत बैठकांचा धडाका सुरु आहे अनेक खलबत याठिकाणी होत असल्याचे दिसत आहे अनेक कार्यकर्त्यांची मोठी रेलचेल दिवसभर माऊली वर पाहायला मिळत आहे त्या उलट माजी आमदार राहुल जगताप,राजेंद्र नागवडे,घनश्याम शेलार,साजन पाचपुते यांच्या संपर्क कार्यलयात मात्र सध्या तरी शुकशुकाट दिसत आहे
हौशी मतदारांचा हिरमोड..
मागील वेळेस झालेल्या नगरपरिषद निवडणुकीच्या तुलनेत चालू वर्षीच्या निवडणुकीत राजकीय समीकरणे आणि राजकीय अवमेळ पाहता निवडणुकीचे वातावरण अद्याप शांतच दिसत आहे मागच्या निवडणुकीत इच्छुक उमेदवारांकडून मतदारांना खुश करण्यासाठी १५दिवस जेवणावळीसह अनेक कार्यक्रम राबवण्यात आले होते परंतु आता मतदानालाच अवघे २० दिवस उरलेले असूनही उमेदवारीचाच घोळ मिटत नसल्या कारणाने काही हौशी मतदारांचा हिरमोड होत असल्याचे दिसत आहे
मतदारांमध्ये उत्सुकता..
श्रीगोंदा नगराध्यक्षपदासाठी कुणाला उमेदवारी मिळणार लढत कशी होणार आपल्या प्रभागातून कोण कोणत्या पक्षाकडून उमेदवारी करणार याकडे मतदारांचे लक्ष लागून राहिले असून शहरात सगळीकडे उमेदवारीच्याच चर्चा रंगताना दिसत आहेत
त्यामुळे आतातरी नेते मंडळींनी उमेदवारीचा सस्पेन्स मिटवून उमेदवार जाहीर करणे गरजेचे आहेत
"निवडणुका" तोंडावर.. तरी अद्याप राजकीय माहोल थंडच...कार्यकर्ते संभ्रमात...मतदारांना उत्सुकता!
Reviewed by Prashasak
on
नोव्हेंबर ११, २०२५
Rating:
Reviewed by Prashasak
on
नोव्हेंबर ११, २०२५
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: