श्रीगोंदा नगरपरिषद निवडणूक यावेळेस वेगळ्या वळणावर जाऊन पोहोचली आहे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीबाबत संभ्रम असतानाच आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाने माजी उपनगराध्यक्षा सौ ज्योती सुधीर खेडकर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर करत एक पाऊल पुढे टाकले आहे नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पहिला पक्ष ठरला आहे सौ ज्योती खेडकर यांच्या नेतृत्वात श्रीगोंद्यात राष्ट्रवादी काँग्रेस सर्व २२जागा पूर्ण ताकतीने लढवणार असल्याचे राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने आज श्रीगोंद्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले
या पत्रकार परिषदेसाठी घनश्याम शेलार,राजेंद्र नागवडे,राहुल जगताप,आण्णासाहेब शेलार,बाळासाहेब नाहटा,सौ ज्योती खेडकर,सुधीर खेडकर उपस्थित होते
यावेळी बोलताना अजित पवार यांच्या व्हिजन प्रमाणे श्रीगोंद्यात विकास योजना राबवण्यासाठी आणि बारामती प्याटर्न श्रीगोंद्यात राबवण्यासाठी ज्योतीताई खेडकर यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे घनश्याम शेलार यांनी सांगितले तसेच भाजप ला आज उमेदवारीसाठी इतर पक्षातून उमेदवार आयात करावे लागतात हीच का त्यांची कर्तबगारी असा टोला शेलार यांनी नाव न घेता पाचपुते यांना लगावला
राजेंद्र नागवडे यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देताना मनोहर पोटे हे मागच्या वेळी तुमच्याच पक्षाकडून नगराध्यक्ष झाले होते त्यांच्या कार्यकाळात भ्रष्टाचार झाल्याची टीका झाली तेव्हा आपण गप्प का होता असे विचारले असते यावर आपण योग्यवेळी बोलू असे नागवडे यांनी सांगतानाच जगताप आणि नागवडे विधानसभेला विरोधात लढून आता एकत्र आले याबाबत लोकांमध्ये नाराजी आहे त्याचा फटका या निवडणुकीत बसेल का असे विचारले असता त्याचा काही परिणाम होणार नसल्याचे नागवडे यांनी सांगितले तसेच बाबासाहेब भोस यांना सोबत घेण्याबाबत चर्चा झाली होती परंतु काही मुद्द्यानवर एकमत होऊ शकले नाही असे त्यांनी सांगितले
उमेदवारीत धक्कातंत्र...
उमेदवारी जाहीर होण्याच्या शेवटच्या क्षणापर्यत मनोहर पोटे हेच राष्ट्रवादी कडून निवडणूक लढवतील अशी जोरदार चर्चा होती एवढेच नाही तर पोटे यांच्या पत्नी शुभांगी पोटे याच राष्ट्रवादी च्या उमेदवार असल्याचे बाहेर खात्रीशीर रीत्या सांगितले जात होते परंतु आज राष्ट्रवादी कडून धक्कातंत्राचा वापर करत ओबीसी चेहेरा म्हणून खेडकर यांना उमेदवारी जाहीर करत धक्कातंत्राचा वापर केला असे म्हणणे वावगे ठरणार नाही
अजित पवार यांनी विरोध केल्यामुळे पोटे यांची उमेदवारी बदलली गेली का असा प्रश्न विचारला असता पोटे यांच्या उमेदवारी बाबत आमच्याकडे कुठलीच चर्चा नव्हती आमच्या पक्षापेक्षा शहरातच तशी जास्त चर्चा रंगवली गेली होती असे घनश्याम शेलार यांनी सांगतानाच नगराध्यक्ष पदासाठी मी इच्छुक नव्हतो कार्यकर्त्यांनी तशी इच्छा व्यक्त केल्याचे शेलार यांनी स्पष्ट केले
२२ जागांचे वाटप हे प्रत्येक प्रभागातील मेरिट नुसार केले जाणार असल्याचे सर्व नेत्यांनी सांगितले
*आम्हाला बाहेरून उमेदवार आयात करण्याची गरज नाही*
आज राजेंद्र नागवडे आणि राहुल जगताप यांच्या समर्थकांचा भाजपात प्रवेश होत आहे त्या प्रमाणे राष्ट्रवादीत काही प्रवेश येत्या काही दिवसात होणार का असे विचारले असता आमच्याकडे सक्षम उमेदवार आहेत त्यामुळे आम्हाला बाहेरून उमेदवार आयात करण्याची गरज नसल्याचे सांगतानाच माजी आमदार राहुल जगताप यांनी आमदार विक्रम पाचपुते यांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला
श्रीगोंद्याची बारामती करणार...
श्रीगोंद्यात बारामती प्याटर्न राबवणार नाही तर श्रीगोंद्याचीच विकासाच्या बाबतीत बारामती करणार असल्याचे मत राष्ट्रवादी कडून नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवणाऱ्या ज्योती खेडकर यांनी व्यक्त केले तसेच सर्व २२नगरसेवक निवडून आणण्याचा आत्मविश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला
राष्ट्रवादी ची उमेदवार घोषित करण्यात आघाडी...धक्कातंत्राचा वापर!
Reviewed by Prashasak
on
नोव्हेंबर १२, २०२५
Rating:
Reviewed by Prashasak
on
नोव्हेंबर १२, २०२५
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: