कॉपी करण्याची संधी नको म्हणून उशीर... जनतेचा ज्याला कौल त्यालाच संधी...२३/०ने विजय मिळवण्याचा आमदारांचा विश्वास!
प्रशासक न्यूज,दि.१२नोव्हेंबर २०२५
२०१९ च्या नगरपरिषद निवडणुकीत अगदी थोड्या मतावरून भाजप च्या उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागला होता परंतु परभवातून काही गोष्टी शिकायला मिळतात शहरातील लोकांना भाजपची सत्ता नगरपरिषदेत यावी असे मनापासून वाटतं असून कार्यकर्त्यांनी सर्व शहर पिंजून काढण्याचे आवाहन करतानाच यावेळी २३/०अशी निवडणूक जिंकणार असल्याचा आत्मविश्वास आमदार विक्रम पाचपुते यांनी व्यक्त केला
आज सायंकाळी माऊली निवासस्थानी आजी माजी नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते यांचा माजी मंत्री बबनराव पाचपुते प्रतिभा वहिनी पाचपुते आ विक्रम पाचपुते यांच्या उपस्थितीत प्रवेश झाला या प्रवेशानंतर आमदार बोलत होते
नगरसेविका सीमाताई गोरे,प्रशांत गोरे,माजी उपनगराध्यक्ष राजूदादा गोरे,अर्चनाताई गोरे,सागर गोरे यांनी मोठं शक्ती प्रदर्शन करत भाजपात प्रवेश केला त्याचप्रमाणे सेवा निवृत्त पोलीस अधिकार कांतीलाल कोथिंबीरे,माजी नगराध्यक्षा सुनीता शिंदे,मच्छिन्द्र शिंदे यांनी देखील रॅली काढत शक्ती प्रदर्शनात प्रवेश केला,सुरेश आळेकर,महेंद्र शेठ आळेकर,नगरसेविका संगीता ताई मखरे,सतीश मखरे,विकास बोरुडे,भाऊसाहेब खेतमाळीस,नाना आनंदकर,संजय आनंदकर,बापूराव सिदनकर,राजेंद्र सिदनकर,आजिम जकाते,जमीर जकाते,लक्ष्मण कोथिंबीरे यांच्यासह १२९ लोकांनी भाजपात आज प्रवेश केला
*बेरजेच्या राजकारणात वजाबाकी होता कामा नये*
आमच्या विचारांशी जुळणाऱ्या कार्यकर्त्यांना भाजपचे दरवाजे कायम खुले असल्याचे सांगताना भाजप मध्ये येणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे पण त्याचवेळी जुन्या नव्या कार्यकर्त्यांचा मेळ घालण्यासाठी बेरजेच्या राजकारणात वजाबाकी होता कामा नये अशी अप्रत्यक्ष सूचना पाचपुते यांनी कार्यकर्त्यांना केली
म्हणून निर्णय घ्यायला उशीर..
जनतेच्या मनातील नगरसेवक आणि नगराध्यक्ष व्हावा म्हणून शहरात जनमत चाचणी सुरु आहे दोन दिवसात त्याचा रिपोर्ट येईल सर्व्हे सुरु असल्यामुळे उमेदवारीचा निर्णय घेण्यास उशीर होत असल्याचे आमदार पाचपुते यांनी स्पष्ट केले
त्यालाच संधी मिळणार...
मी कुणालाही उमेदवारीचा शब्द दिलेला नाही सर्व्हे मध्ये जनतेतून ज्याच्या नावाला पसंती मिळेल त्यालाच भाजप उमेदवारी देणार असल्याचे स्पष्ट करतानाच जनतेच्या मनातील नगराध्यक्ष होईल असे देखील पाचपुते यांनी सांगितले
विरोधकांना कॉपी करण्याची सवय...
मी विरोधकांवर टीका करत नाही त्यांची स्तुती करतो पण श्रीगोंद्यातील विरोधकांना दुसऱ्याच कॉपी करण्याची सवय आहे यावेळी त्यांनी ती संधी मिळू नये म्हणून आपण निर्णय घेण्यास वेळ लावल्याचे सांगताना पाचपुते यांनी विरोधकांना टोला लगावला
आज झालेल्या प्रवेशामुळे शहरात भाजपला बळकटी मिळणार आहे आता भाजप नगराध्यक्ष पदाची उमेदवारी कुणाला देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे
कॉपी करण्याची संधी नको म्हणून उशीर... जनतेचा ज्याला कौल त्यालाच संधी...२३/०ने विजय मिळवण्याचा आमदारांचा विश्वास!
Reviewed by Prashasak
on
नोव्हेंबर १२, २०२५
Rating:
Reviewed by Prashasak
on
नोव्हेंबर १२, २०२५
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: