"जनमत" चाचणी कुणाला तारणार,कुणाला घरी पाठवणार..'इच्छुकांचा' जीव टांगणीला..!


प्रशासक न्यूज,दि.१४नोव्हेंबर २०२५
विशाल अ चव्हाण

भाजपकडून यावेळेस नगरपरिषद निवडणुकीत सर्व्हेच्या आधारावर उमेदवारी देण्याचा नवा फॉर्म्युला राबवला जात आहे सर्व्हेत जो अव्वल त्यालाच उमेदवारी हा भाजपकडून यावेळेस निकष लावण्यात आल्यामुळे अनेक आजी माजी नगरसेवकांसह इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे जनमत चाचणीत ज्या उमेदवाराच्या नावाला पसंती तो भाजपचा उमेदवार राहणार असल्यामुळे जनमत चाचणीत अव्वल स्थानी येण्यासाठी आता काही इच्छुकांनी आपआपला प्रभाग पिंजून काढण्यास सुरुवात केली असून चाचणीचा कौल आपल्या बाजूने रहावा म्हूणन जनसंपर्क सुद्धा वाढवला आहे

*भाजप कडून एका दगडात अनेक पक्षी गारद..

नेत्यांच्या मर्जीमुळे मिळणाऱ्या उमेदवाऱ्या या सर्व्हे मुळे कापल्या जाण्याची शक्यता आहे तसेच सर्व्हेत नाव न आल्यामुळे उमेदवारी भेटणार नाही त्यामुळे तिकीट कापल्या नंतर नेत्यावर नाराजगी व्यक्त करण्याची कार्यकर्त्यांना संधी राहणार नाही सर्व्हेत पहिल्या क्रमांकावर येण्यासाठी सर्वच इच्छुकांनी प्रचार सुरु केल्यामुळे भाजपची वातावरण निर्मिती होण्यास मदत होणार आहे त्यामुळे भाजपने सर्व्हे चा फॉर्म्यूला राबवून एका दगडात अनेक पक्षी गारद केले आहेत असे म्हणणे वावगे ठरणार नाही 

सर्व्हेबाबत संमिश्र प्रतिक्रिया...

भाजप च्या उमेदवारी वाटपाच्या नवीन पद्धतीवर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत काहींनी अश्या प्रकारे उमेदवारी वाटपावर नाराजी व्यक्त केली असली तरी जनमत चाचणीच्या आधारे उमेदवारी दिली जाणार असल्यामुळे योग्य व्यक्तीला संधी मिळेल असे मत अनेकजण व्यक्त करत आहेत या पद्धतीला काहींनी पसंती दर्शवली आहे तर नेत्यांचे सर्व ठरलेले आहे फक्त १७ तारखेपर्यत वेळ मारून नेण्यासाठी नेत्यांनी लढवलेली ही शक्कल असल्याचे काहीजण बोलत आहेत 

अपक्ष उमेदवारी अर्ज भराल तर...खबरदार*

आता भाजप मध्ये असणाऱ्या कोणत्याही इच्छुकाने अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यास त्याचा उमेदवारी देताना विचार होणार नाही असे फर्मान भाजपकडून काढण्यात आले आहे भाजप च्या वरिष्ठ पातळीवरून तसे निरोप खाली देण्यात आल्याची माहिती समजतं आहे श्रीगोंद्यात देखील तसा निरोप सर्वांना देण्यात आल्यामुळे भाजपात नव्याने प्रवेश केलेल्या इच्छुकांसह पक्षातील जुन्या इच्छुकांची मोठी कोंडी झाली असून नाराज कार्यकर्त्यांना पळापळ करण्याची कोणतीच संधी मिळणार नाही यादृष्टीने भाजपच्या राजकीय रणनीतीचा हा एक भाग असल्याचे पहायला मिळत आहे

मतदानाच्या आधीच इच्छुकांची परीक्षा...
सर्व्हेच्या आधारावर उमेदवार निवडण्याच्या या प्रक्रियेमुळे इच्छुक उमेदवारांना दोन वेळा जनतेच्या परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे प्रत्यक्ष मतदाना आधी जनमत चाचणी त्यांना पास करावी लागणार आहे त्यामुळे आता जनमत चाचणी कुणाला कौल देणार आणि कुणाला घरी बसवणार हे मात्र येत्या १७ तारखेलाच समजणार आहे

"जनमत" चाचणी कुणाला तारणार,कुणाला घरी पाठवणार..'इच्छुकांचा' जीव टांगणीला..! "जनमत" चाचणी कुणाला तारणार,कुणाला घरी पाठवणार..'इच्छुकांचा' जीव टांगणीला..! Reviewed by Prashasak on नोव्हेंबर १४, २०२५ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.