प्रशासक न्यूज,दि.१५नोव्हेंबर २०२५
श्रीगोंदा पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे पोलीस कर्मचारी संदीप राऊत यांच्या वादग्रस्त कामगिरीमुळे त्यांची तत्काळ बदली करण्याच्या मागणीसाठी काष्टी येथील प्रतापराव जाधव यांनी आजपासून नाशिक येथील विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे
श्रीगोंदा पोलीस ठाण्यातील कर्मचारी राऊत यांच्यावर जाधव यांनी भ्रष्टाचार, गुन्हेगारांना,तसेच अवैध व्यवसायांना पाठबळ देणे,हप्ते वसुली करणे यासह अनेक गंभीर आरोप करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी काही दिवसांपूर्वी पत्राद्वारे अहिल्यानगर पोलीस अधीक्षक आणि पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे केली होती तसेच सदर कर्मचाऱ्यावर कारवाई न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा ईशारा देखील पत्रात देण्यात आला होता परंतु सदर पोलीस कर्मचाऱ्यावर कुठलीच कारवाई न झाल्यामुळे तक्रारकर्ते प्रताप जाधव यांनी आजपासून उपोषणास सुरुवात केली आहे
*कर्मचाऱ्याला नेमके कुणाचे पाठबळ...*
सदर कर्मचाऱ्यावर एवढे गंभीर आरोप होऊनसुद्धा आणि तशी लेखी तक्रार वरिष्ठाकडे करून सुद्धा त्या कर्मचाऱ्यावर कोणतीही कारवाई न झाल्यामुळे 'साहेबाच्या' मर्जीतील या कर्मचाऱ्याला नेमक कोण पाठीशी घालतय असा सवाल आता उपस्थित होत आहे
जाधव यांनी उपोषणाचा बडगा उगारल्यानंतर आतातरी वरिष्ठ पोलीस अधिकारी या प्रकरणात काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
"त्या" कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरु..!
Reviewed by Prashasak
on
नोव्हेंबर १५, २०२५
Rating:
Reviewed by Prashasak
on
नोव्हेंबर १५, २०२५
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: