प्रशासक न्यूज,दि.१५नोव्हेंबर २०२५
श्रीगोंदा नगरपरिषद निवडणूक सुरुवातीला पाचपुते विरुद्ध सर्व पाचपुते विरोधक अशीच होईल असे सर्वांना वाटतं होते परंतु नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसह पोटे यांना वाढलेला विरोध आणि त्यातून मनोहर पोटे यांना खिंडीत गाठण्याच्या प्रयत्नात आता पाचपुते विरोधकांमध्येच फूट पडली आहे त्या फुटीचा फायदा कुणाच्या पथ्यावर पडणार हे ३ डिसेंबरला निकालाच्या दिवशी समजणार आहे सध्या इतर पक्षानी आपले उमेदवार घोषित केले असले तरी भाजप च्या थांबा आणि पहा या भूमिकेमुळे मोठी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे
राष्ट्रवादी अजित पवार गट,शिवसेना शिंदे गट यांनी आपला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर केला आहे महाविकास आघाडीचा उमेदवार देखील ठरलेला आहे असे असतानाच आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे ते म्हणजे भाजप आणि आमदार विक्रम पाचपुते यांच्या निर्णयाकडे भाजप ची उमेदवारी कुणाला हा सध्या शहरात खूप मोठा सस्पेन्स निर्माण झाला आहे सगळीकडे याच उमेदवारीवर चर्चा रंगत आहे
सर्व्हेत जो अव्वल त्यालाच नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळणार असल्याचे भाजप कडून वारंवार सांगण्यात येत आहे
*भाजपकडून हे आहेत इच्छुक..*
भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी इच्छुकांमध्ये कांतीलाल कोथिंबीरे,नानासाहेब कोथिंबीरे,बापुशेठ गोरे,श्रीमती छायाताई गोरे,श्रीमती सुनीता खेतमाळीस,सौ सुनीता शिंदे,अशोक खेँडके,महावीर पटवा,मारुती औटी हे नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असून ती नावे वरिष्ठाणा कळवण्यात आल्याची माहिती समजते भाजप कडून सर्व्हे सुरु आहे आधी एक सर्व्हे झाला असून दुसऱ्या सर्व्हे चा अहवाल उद्या दुपारपर्यत येण्याची शक्यता व्यक्त होत आहे
हे नाव सध्या आघाडीवर...
भाजपकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी सध्या तरी श्रीमती सुनीता खेतमाळीस यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे खेतमाळीस आडनावाचे शहरात असलेले मोठे मतदान,पती स्व.संतोष खेतमाळीस यांच्या प्रति असलेली सहानूभूती क्लीन इमेज या सर्व गोष्टीमुळे श्रीमती सुनीता खेतमाळीस यांचे नाव सध्या तरी आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे त्याचप्रमाणे सौ सुनीता शिंदे,कांतीलाल कोथिंबीरे,आणि श्रीमती छायाताई गोरे ही नावे देखील भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी सध्या चर्चेत आहेत त्यामुळे आता यापैकी नेमकी उमेदवारीची माळ कुणाच्या गळ्यात पडते सर्व्हेत कुणाला पसंती मिळते भाजप नेते आणि आमदार विक्रम पाचपुते कुणाच्या नावाला पसंती देतात कि ऐनवेळी वेगळेच नाव समोर करून पाचपुते धक्कातंत्राचा वापर करतात याकडे संपूर्ण श्रीगोंदेकरांचे लक्ष लागले आहे
"उमेदवारी" बाबत प्रचंड उत्सुकता.. पण भाजप थांबा आणि पाहा च्या भूमिकेत... ही नावे आहेत चर्चेत!
Reviewed by Prashasak
on
नोव्हेंबर १५, २०२५
Rating:
Reviewed by Prashasak
on
नोव्हेंबर १५, २०२५
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: