श्रीगोंदा तालुक्यातील वाढती गुन्हेगारी, तालुक्याचा मोठा विस्तार लक्षात घेऊन तपास कामाला गती मिळावी कायदा सुव्यस्था अबाधित रहावी यासाठी बेलवंडी पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली बेलवंडी पोलीस ठाण्याच्या स्थापनेपासून आतापर्यतचा इतिहास लक्षात घेता काही बोटावर मोजण्याएवढे अधिकारी सोडले तर बेलवंडी पोलीस ठाण्याचे प्रभारी म्हणून कामगिरी केलेल्या अनेक ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांची कामगिरी वादग्रस्त आणि निराशाजनकच ठरल्याचे पाहायला मिळाले याला अपवाद ठरले ते म्हणजे बेलवंडी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे.
ठेंगे यांनी बेलवंडी पोलीस ठाण्याचा पदभार स्विकारल्यानंतर काही दिवसातच या ठिकाणी आपल्या कामाची चुणूक दाखवली होती अनेक गुन्ह्यांचा त्यांनी तत्काळ छडा लावत आपल्या कामाची छाप पाडली होती त्याच कामाची पावती म्हणून त्यांची राहुरी पोलीस स्टेशन ला पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली त्यानंतर बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक म्हणून बदलून आलेले संतोष भंडारे यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली भंडारे यांच्या कार्यपद्धतीवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती त्यांची नुकतीच मुख्यालयात बदली करण्यात आली आता त्यांच्या जागी सहायक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर यांची बेलवंडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे त्यांच्यासमोर पोलीस ठाण्याच्या कारभाराची घडी बसवण्या सोबतच याठिकाणी कार्यक्षम काम करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे
रुजू होताच,चोरट्यांची सलामी..
सोनवलकर यांनी बेलवंडी चा पदभार स्वीकारताच त्यांना चोरट्यांनी सलामी दिली आहे बेलवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोंडेगव्हाण या ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी एका बंद घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश करत कपाटातील सामानाची ऊचकापाचक करून १५००रु रोख रक्कम व ६७,५००रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने असा एकूण ६९,०००रु किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे सदर घटना काल दि १५ रोजी रात्री नऊ ते आज सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान घडली आहे सदर चोरीबाबत लंकाबाई बाजीराव शेळके यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे या चोरीचा तपास करण्याचे आव्हान नवीन ठाणे प्रभारी अधिकारी सोनवलकर यांच्या समोर असणार आहे
त्यामुळे आता सोनवलकर हे बेलवंडी पोलीस ठाण्याचा कारभार कसा चालवतात याकडे बेलवंडीकरांचे लक्ष लागले आहे
नव्याने रुजू झालेल्या "प्रभारी अधिकाऱ्यां" समोर प्रभावी कामगिरीचे 'आव्हान'!...रुजू होताच...
Reviewed by Prashasak
on
नोव्हेंबर १६, २०२५
Rating:
Reviewed by Prashasak
on
नोव्हेंबर १६, २०२५
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: