"बेलवंडी" पोलीस ऍक्शन मोड मध्ये....पदभार स्वीकारताच...


प्रशासक न्यूज,दि.१९नोव्हेंबर २०२५

बेलवंडी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी म्हणून नव्यानेच रुजू झालेले सहायक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर यांनी बेलवंडी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी म्हणून पदभार घेऊन आठवडा उलटत नाही तोच बेलवंडी पोलीस स्टेशन हद्दीत कारवाईचा बडगा उगारला आहे

काल दि १८ रोजी सायंकाळी चार ते पाच वाजण्याच्या सुमारास स. पो.नि.सोनवलकर यांच्या मार्गर्शनाखाली बेलवंडी पोलिसांनी दाणेवाडी शिवारात गावठी दारू तयार करणाऱ्या दोन हातभट्ट्यांवर छापा टाकत गावठी हातभट्टी तयार करण्यासाठी लागणारे ३लाख रुपये किंमतीचे ६ हजार लिटर कच्चे रसायन आणि २हजार रुपये किंमतीची २०लिटर तयार गावठी हातभट्टी दारू असा एकूण तीन लाख दोन हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल नष्ट केला आहे

पो कॉ दादासाहेब क्षीरसागर यांच्या फिर्यादीवरून रमेश सुदाम गिऱ्हे आणि पो कॉ विनोद पवार यांच्या फिर्यादीवरून कानिफनाथ नारायण गव्हाणे या दोघां विरोधात बेलवंडी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे

बेलवंडी पोलीसांनी केलेल्या कारवाईचे कौतुक होत असून या कारवाईत सातत्य ठेवण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे
"बेलवंडी" पोलीस ऍक्शन मोड मध्ये....पदभार स्वीकारताच... "बेलवंडी" पोलीस ऍक्शन मोड मध्ये....पदभार स्वीकारताच... Reviewed by Prashasak on नोव्हेंबर १८, २०२५ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.