शासकीय वसाहत की "या"व्यवसायाचा अड्डा,खुलेआम सुरु आहे हा....श्रीगोंद्यातील प्रकार!


प्रशासक न्यूज,दि.२३ऑगस्ट२०२५

श्रीगोंदा शहरातील एका गजबजलेल्या भागात शासकीय वसाहती मध्ये खुलेआम भरदिवसा वेश्याव्यवसाय सुरु आहे विशेष म्हणजे एवढ्या लोकवस्तीत सुरु असलेल्या या गोरख धंद्याबद्दल कुणालाच साधी कल्पना पण नाही हे विशेष.

आणि त्यावर कहर म्हणजे याच वसाहती शी निगडित असलेल्या एका शासकीय कर्मचाऱ्याकडूनच हा धंदा चालवला जात असल्याचे या भागातील नागरिकांचे म्हणणे आहे काही महिन्यांपूर्वी हा कर्मचारी सेवेतून निवृत्त झालेला असला तरी संबंधित शासकीय वसाहतीची जबाबदारी या कर्मचाऱ्यावर असताना याने असा व्यवसाय करण्यासाठी दोन महिलांना सर्व नियम धाब्यावर बसवत या शासकीय वसाहतीत राहण्यासाठी जागा दिली शासकीय कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या या वसाहतीमध्ये बिगर शासकीय व्यक्तीला खोली दिलीच कशी याबाबत अनेक सवाल उपस्थित होत आहेत

सदर कर्मचारी आता सेवानिवृत्त झाला असला तरी त्याच्या मार्फतच या वसाहतीत दोन खोल्यांमध्ये दिवसाढवळ्या ही रंगरलिया सुरु आहे या कर्मचाऱ्याला ना पोलिसांचा धाक वाटतोय ना कुणाची भीती हे विशेष तसेच एवढ्या मोक्याच्या ठिकाणी असला काही प्रकार सुरु असेल याबाबत कुणाला साधा संशय सुद्धा वाटला नाही परंतु काही लोकांच्या सतर्कतेमुळे शासकीय वसाहतीत सुरु असलेल्या या काळ्या धंद्या बाबत आज काही लोकांना संशय आला त्यानंतर त्याबाबत या जागरूक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली पण नेहमीप्रमाणे पोलिसांनी त्याकडे डोळेझाक करत कुठलीही कारवाई करणे तर दूर पण पोलीस तिकडे फिरकले सुद्धा नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे

शासकीय वसाहतीत अश्या प्रकारे गैरशासकीय लोक राहुच कसे शकतात आणि या प्रकाराबाबत या खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष का नाही याचा देखिल आता शोध घेणे जरुरी आहे

अश्या प्रकारे शहरातील मोक्याच्या ठिकाणी सुरु असलेल्या या धंद्यावर तत्काळ कारवाईची मागणी नागरिकांनी केली आहे

शासकीय वसाहत की "या"व्यवसायाचा अड्डा,खुलेआम सुरु आहे हा....श्रीगोंद्यातील प्रकार! शासकीय वसाहत की "या"व्यवसायाचा अड्डा,खुलेआम सुरु आहे हा....श्रीगोंद्यातील प्रकार! Reviewed by Prashasak on ऑगस्ट २३, २०२५ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.