'आदर्श उपक्रम'..मिरवणुकीऐवजी छावा चित्रपट मोफत दाखवणार!

प्रशासक न्यूज,दि.१५मार्च२०२५

कोणत्याही महापुरुषांची जयंती म्हंटल की मोठ्या आवाजात वाजणारे डीजे फटाक्यांची आतिषबाजी असे चित्र डोळ्यासमोर उभे राहते डीजेच्या आणि फटाक्यांच्या आवाजातून होणारे ध्वनी प्रदूषण टाळून मिरवणूकीवर होणाऱ्या खर्चाला कात्री लावून त्या ऐवजी सर्व लोकांना मोफत छावा चित्रपट दाखवण्याचा निर्णय शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष)आणि हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे प्रतिष्ठान यांनी घेतला आहे येत्या १७मार्च रोजी श्रीगोंद्यात या प्रतिष्ठान च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी होत आहे त्यानिमित्त छत्रपती संभाजी महाराज यांचा चित्रपट दाखवून महाराजांचे कार्य तळागाळातील लोकांपर्यत पोहोचावे आणि ज्या लोकांची ईच्छा असूनही त्यांना परिस्थिती अभावी चित्रपट गृहात जाऊन हा चित्रपट पाहता येत नाही अश्या सर्वांसाठी मोफत चित्रपट दि १७मार्च सोमवार रोजी रात्री ८वाजता शेख महंमद महाराज प्रांगणात दाखवला जाणार आहे अशी माहिती उत्सव समितीच्या वतीने देण्यात आली
छत्रपती शिवाजी महाराजांचे गोरगरीब जनतेसाठी असलेले कार्य, त्यांचे शौर्य आणि पराक्रम यांचे स्मरण ठेवत ऐतिहासिक वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी हा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सुरेश देशमुख (बाबा) आणि उपाध्यक्ष संभाजी घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव पार पडणार असून, हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख (अहिल्यानगर, दक्षिण) बाळासाहेब दुतारे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण नियोजन करण्यात आले आहे.

शिवजयंती उत्सवाची सुरुवात सकाळी १०:०० वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून होणार आहे. या वेळी अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून, शिवरायांच्या कार्याचा गौरव करण्यात येणार आहे.

यानंतर सकाळी ११:०० वाजल्यापासून दिवसभर, इतिहास अभ्यासकांचे व्याख्यान व विचारमंथन, शिवचरित्रावर मान्यवरांचे भाषण व शुभेच्छा संदेश, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम राबविण्यात येतील.

शंभूप्रेमींनी आणि शिवभक्तांनी या ऐतिहासिक क्षणांचा लाभ घ्यावा व मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.




'आदर्श उपक्रम'..मिरवणुकीऐवजी छावा चित्रपट मोफत दाखवणार! 'आदर्श उपक्रम'..मिरवणुकीऐवजी छावा चित्रपट मोफत दाखवणार! Reviewed by Prashasak on मार्च १४, २०२५ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.