प्रशासक न्यूज,दि.१३जानेवारी२०२५
श्रीगोंदा तालुक्यातील उत्तर भागातील एका मोठ्या गावातील एका देवस्थानच्या जवळपास ६०एकर जमिनीची परस्पर विक्री झाल्याची आता दबक्या आवाजात चर्चा सुरु झाली असून विशेष म्हणजे प्रमुख शासकीय कार्यालयातील या देवस्थानशी संबंधित कागदपत्रांची फाईलच आता गायब झाली आहे का ती जाणीवपूर्वक कुणी गायब केली आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे या प्रकरणाबाबत अद्याप तक्रार करण्यास कुणी पुढे आलेले नाही परंतु या जमिनीची विक्री झाल्याची चर्चा मात्र जोरदार आहे
श्रीगोंदा शहरातील घोडेगाव रस्त्यावरील एका समाजाच्या संस्थेच्या २७एकर जमिनीची विक्री वादाच्या भोवऱ्यात सापडलेली असतानाच आता या नवीन प्रकरणाची चर्चा सुरु झाल्यामुळे श्रीगोंदा तालुक्यात नेमक चाललंय काय असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे
या देवस्थान प्रमाणेच तालुक्यातील अजून तीन ते चार देवस्थानच्या इनामी जमीनींची परस्पर विक्री झाल्याची देखील चर्चा कानावर पडत आहे त्यामुळे देवस्थानच्या या जमिनीनवर नेमकी कुणाची वक्रदृष्टी पडली असा प्रश्न उपस्थित होत आहे असे असले तरी शासकीय खात्यातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या संगनमता शिवाय अश्या प्रकारे विक्री होणे शक्यच नाही त्यामुळे या देवस्थानच्या जमीनी ची विक्री करण्यासाठी कोणत्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे याचा शोध घेवून त्यांच्यावर कडक कारवाई करणे गरजेचे आहे

श्रीगोंदा तालुक्यातील 'त्या' जमिनींवर नेमका कुणाचा डोळा?
Reviewed by Prashasak
on
जानेवारी १३, २०२५
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: