काल शुक्रवारी रात्री श्रीगोंदा पारगाव रस्त्यावर या एकाच रस्त्यावर एक ते दीड तासाच्या आंतराने घडलेल्या दोन वेगवेगळ्या विचित्र अपघातात तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे तर दोन तरुण या अपघातात गंभीर जखमी झाले असून त्यातील एकाला नगर येथे तर दुसऱ्याला दौंड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे
या अपघातात विकास दादासाहेब वाकळे वय २२,गणेश छगन उर्फ छबू वाकळे वय २८,पिंटू उर्फ लक्ष्मण नारायण भेसर वय ४२ तिघे रा पारगाव हे या अपघातात मयत झाले आहेत तर अक्षय गायकवाड आणि आणखी एक तरुण दुसऱ्या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत
मागील काही महिन्यांपूर्वी ढवळगाव शिवारात झालेल्या अपघातात पारगाव येथील चार जणांना आपला जीव गमवावा लागला होता आणि रात्री झालेल्या अपघातात परत पारगाव येथील तीन जणांना आपला जीव गमवावा लागला त्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे
या अपघाता बाबत समजेलेली माहिती अशी की काल रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पारगाव गावातील महादेव मंदिराजवळ सरस्वती नदी पुलावर पारगाव येथील वरील तीन मयत इसम दुचाकी वर जात असताना त्यांच्या दुचाकीला अपघात होऊन हे पुलावरून खाली पडले त्यात गंभीर दुखापत झाल्यामुळे एक जण जागीच ठार तर दोघांचा श्रीगोंद्यात उपचारा दरम्यान रात्री मृत्यू झाला
त्यानंतर या अपघातात जागीच ठार झालेल्या मयताची डेडबॉडी श्रीगोंद्याला घेऊन येत असताना श्रीगोंदा पारगाव रस्त्यावर स्वामी विवेकनंद मेडिकल कॉलेज पासून काही आंतर पुढे पारगावच्या दिशेला डेडबॉडी घेऊन जाणारी रुग्णवाहीका आणि पारगाव च्या दिशेने जाणारी कार यांच्यात समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला यात रुग्णवहिकेचा चालक अक्षय गायकवाड आणि मयत व्यक्तीचा पुतण्या हे दोघे गंभीर जखमी झाले अपघात एवढा भीषण होता की या आवाजाने आजूबाजूचे नागरिक तिथे जमा झाले त्या लोकांनी मोठ्या मेहनतीने रुग्णवाहिकेचा दरवाजा तोडून या जखमी तरुणांना बाहेर काढत तात्काळ श्रीगोंद्यात उपचारासाठी पाठवले दुसऱ्या कारमधील व्यक्तीला किरकोळ दुखापत झाली असून तो कार चालक श्रीगोंदा महसूल मधील तलाठी असल्याचे समजते
पोलिसांना घटनेबाबत माहिती समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले अश्या दोन विचित्र अपघातात तीन तरुणांना आपला जीव गमवावा लागला तर दोन तरुण गंभीर जखमी झाले या बाबत सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे

विचित्र अपघातात ३ ठार, दोन गंभीर जखमी!
Reviewed by Prashasak
on
सप्टेंबर २०, २०२४
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: