राहुल आता आमदार होऊनच हे प्रश्न सोडव!थोरल्या साहेबांचे दादांच्या उमेदवारीवर स्पष्ट सुतोवाच!


विशाल अ चव्हाण 
प्रशासक न्यूज,दि.२१सप्टेंबर

जो कायम लोकांच्या संपर्कात राहून लोकांची कामे करतो त्याला उमेदवारी दिली जाते राहुल आमदार नसला तरी तो कधी थांबला नाही माझ्याकडे सर्व लेखाजोखा आहे त्यामुळे तुम्ही निश्चिन्त राहा आणि तयारीला लागा असे कार्यकर्त्यांना सांगतानाच राहुल तूला माझ्यावर भरवसा नाही का असे माजी आमदार राहुल जगताप यांना सांगत श्रीगोंद्याची जागा राष्ट्रवादीचीच असून तिथून तुतारी राहुल जगताप यांनाच मिळणार असल्याचे स्पष्ट सुतोवाच आज शरद पवार यांनी दिले 

मुंबईतून शिवसेनेचा कुणी नेता येऊन श्रीगोंद्यात उमेदवारी जाहीर करतो हे लोकशाहीत बसत नाही असे म्हणत पवार यांनी खासदार संजय राऊत यांनाही अप्रत्यक्षपणे खडेबोले सुनावलेत तसेच तुम्ही काळजी करु नका श्रीगोंद्याची जागा राष्ट्रवादीचीच असे खुद्द माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार)गटा चे अध्यक्ष शरद पवार यांनीच सांगतिले

आज श्रीगोंद्यातील जवळपास दोनशे ते तीनशे कार्यकर्त्यांसह माजी आमदार राहुल जगताप यांनी थेट बारामतीत जाऊन शक्तीप्रदर्शन करत शरद पवार यांची भेट घेतली यावेळी पवार यांनी काही एक न बोलता थेट माईक हातात घेऊन कार्यकर्त्यांना उद्देशून तुम्ही इथे कश्यासाठी आलात हे मला समजतंय तुम्ही काळजी करु नका नुसती श्रीगोंदाच नाही तर जिल्ह्यातील सहा जागा राष्ट्रवादीच्या असल्याचे पवार यांनी ठामपणे सांगितले

त्यामुळे आज कार्यकर्त्यांच्या समोर खुद्द शरद पवार यांनीच श्रीगोंद्याची जागा राष्ट्रवादीचीच असे सांगत राहुल जगताप यांना तयारीला लागा सांगत विधानसभा उमेदवारीसाठी ग्रीन सिग्नल दिला आहे

*आता आमदार होऊनच हे प्रश्न मार्गी लावा*
आज शरद पवार यांना कुकडी पाणी प्रश्न, डिंभे माणिकडोह बोगदा आणि सकाळई योजना याबाबत निवेदन देण्यात आले त्यावेळी अरे आता तूच आमदार होऊन हे प्रश्न मार्गी लाव असे त्यांनी राहुल जगताप यांना सांगितले पवार यांच्या या वक्तव्यामुळे माजी आमदार राहुल जगताप यांच्या उमेवारीवर एक प्रकारे शिक्कामोर्तब झाल्याचेच म्हणावे लागेलं पवार यांच्या या ठामपणा मुळे श्रीगोंदा तालुक्यातील राहुल जगताप यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले आहे 





राहुल आता आमदार होऊनच हे प्रश्न सोडव!थोरल्या साहेबांचे दादांच्या उमेदवारीवर स्पष्ट सुतोवाच! राहुल आता आमदार होऊनच हे प्रश्न सोडव!थोरल्या साहेबांचे दादांच्या उमेदवारीवर स्पष्ट सुतोवाच! Reviewed by Prashasak on सप्टेंबर २१, २०२४ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.