प्रशासक न्यूज,दि.२७सप्टेंबर
लोकसभेला शरद पवार यांच्यासोबत राहिल्यामुळे माजी आमदार राहुल जगताप यांना कारखान्यासाठी पैसे मिळाले नाहीत कुकडी कारखाना अडचणीत असताना सुद्धा राहुल हे पवार यांच्यासोबत राहिले याबद्दल राहुलच करावं तेवढं कौतुक कमी आहे पण आता खुद्द शरद पवार यांनीच राहुल जगताप यांची कारखान्याची अडचण सोडवली असल्यामुळे त्यांच्याबद्दल आता कोणतीच नकारात्मकता राहीलेली नाही समोरून कुणीही इथं येऊन त्यांच्या पक्षाची उमेदवारी जाहीर केली असली तरी श्रीगोंद्याची जागा राष्ट्रवादीचीच असे राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार)गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर सभेत ठणकावून सांगित महाविकास आघाडीचे जागा वाटप झाल्याशिवाय नाव जाहीर करायचे नाही असे ठरल्यामुळे मी आज नाव जाहीर करणार नाही पण तुमच्या मनातला व्यक्तीच आमदार होईल याची खात्री बाळगा असा विश्वास उपस्थित जनसमुदायाला देत पाटील यांनी राहूल जगताप यांच्या उमेदवारीवर अप्रत्यक्षरित्या शिक्का मोर्तब केले
राष्ट्रवादी पक्षाची शिव स्वराज्य यात्रा काल श्रीगोंदा शहरात आली होती त्यानिमित्त शहरातील शेख महंमद महाराज प्रांगणात आयोजित सभेत पाटील बोलत होते ही सभा सायंकाळी ६ वाजता सुरु होणार होती तो जवळपास तीन तास उशिरा ९ वाजता सुरु झाली
यावेळी पुढे बोलताना पाटील म्हणाले लोकसभेला महाविकास आघाडी टिकवण्यासाठी आम्ही माघार घेतली आधी सर्व नेते पक्षात होते तेव्हा ४ खासदार निवडून आले आणि आता आमच्या पक्षातून सगळे निघून गेल्यावर ८ खासदार निवडून आले म्हणजे आमच्यात दोष होता तो दोष बाहेर घेऊन गेल्यामुळे मोदी आणि शहा यांना धन्यवाद देतो असे म्हणत त्यांनी नाव ने घेता अजित पवार यांना चपराक लगावली सत्ता आल्यानंतर कुकडी कारखान्याचे सर्व प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही देखील पाटलांनी यावेळी दिली
*तुम्ही चिंतेत राहू नका,आनंदी व्हा*
साहेब अडचणीच्या काळात साथ देणाऱ्यांना डावलून आता नव्याने येणाऱ्यांना जवळ करु नका या माजी आमदार राहुल जगताप यांच्या वक्तव्याला अनुसरून शरद पवार नावाचा ८४वर्ष्याचा तरुण झंझावात महाराष्ट्रात निर्माण झालाय त्यांची धास्ती भाजपने घेतली आहे त्यामुळे आता शरद पवार यांना भेटणाऱ्यांची संख्या वाढली आहे याबाबत तुम्ही चिंता न करता पक्ष वाढतोय म्हणून आनंदी रहा असा सल्ला पाटील यांनी जगताप यांना दिला
यावेळी बोलताना खासदार अमोल कोल्हे यांनी शेतकऱ्यांच्या मुळावर घाव घालणाऱ्यांना मुळासकट उखडून टाका, लाडक्या बहीण योजनेचे पैसे मिळाले का असे कुणी विचारल्यास आधी दाजींच्या दुधाला भाव द्या असे त्यांना सांगा असे म्हणत कोल्हे यांनी भाजप सरकारचा खरपूस शब्दात चांगलाच समाचार घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली तसेच भाजप मुळे देशाला ईडी कळली असे सांगत भाजपला चपराक लगावली
*तरी पट्ठ्याने मान झुकवली नाही*
शेतकरी हिताचा विचार ने करता फक्त सूडबुद्धीने राजकारण करत लोकसभेला महाविकास आघाडी सोबत राहिल्यामुळे विरोधकांनी कुकडी साखर कारखान्याची १२०कोटी रुपयांची फाईल अडवली आणि राहुल जगताप यांना कोंडीत पकडले बाकीच्या लोकांनी विरोधकांपुढे गुडघे टेकवले पण एवढी अडचण येऊन सुद्धा राहुल जगताप या पट्ठ्याने मान न झुकवता शरद पवार यांची साथ सोडली नाही असे म्हणत खा.कोल्हे यांनी राहुल जगताप यांचे तोंड भरून कौतुक केले
यावेळी बोलताना खासदार निलेश लंके यांनी महागाई वरून तसेच दुधाला शेतीमालाला भाव मिळत नसल्यामुळे केंद्र व राज्य सरकारवर टीका करत माझ्या पाठीशी उभे राहिले तसे राहुल जगताप यांच्या पाठीशी ठामपणे उभे रहा असे सांगत तुमच्या मनातला आमदार होईल असे सांगितले
माजी आमदार राहुल जगताप यांनी बोलताना महाविकास आघाडी सरकार आल्यावर घोड,कुकडी,साकळाई योजनेचे प्रश्न मार्गी लावा,डिभे माणिकडोह बोगद्यासाठी प्रयत्न करा असे सांगत शेतकऱ्यांना सरसकट २लाख रुपयांची कर्जमाफी द्या अशी मागणी केली
*येत्या ५ तारखेच्या आत सर्वांची देणी देणार*
लोकसभेला शरद पवार यांच्यासोबत राहिल्यामुळे मला एनसीडीसी चे पैसे मिळू दिले नाहीत पण आता खुद्द शरद पवार यांनीच कुकडीचा प्रश्न मार्गी लावला आहे त्यामुळे येत्या ५ तारखेच्या आत कुकडीच्या सर्व देणेकरांची बिले आपण अदा करु असे जगताप यांनी जाहीर सभेत काल जाहीर केले तसेच नी स्व बापूंच्या आणि तात्यांच्या विचारांच रक्त माझ्या अंगात असून येत्या विधानसभेला ५०हजार मतांच लीड घेवून विजयी होऊ असा आत्मविश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला
काल झालेल्या सभेसाठी राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख,जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके सुनील गव्हाणे, संदीप वर्पे, हरिदास शिर्के, दीपक भोसले, जिजाबापू शिंदे,राजू पाटील,केशव मगर,बाबासाहेब भोस, बाबासाहेब इथापे,अतुल लोखंडे यांच्यासह मोठा जनसमुदाय उपस्थित होता
श्रीगोंद्याची जागा राष्ट्रवादीचीच--प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील
Reviewed by Prashasak
on
सप्टेंबर २७, २०२४
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: