विशाल अ चव्हाण
प्रशासक न्यूज,दि.२ सप्टेंबर २०२४विधानसभा निवडणुका जश्या जवळ येत आहेत तसे श्रीगोंदा तालुक्याचे राजकीय वातावरण तापत आहे तसेच दिवसागणिक निवडणुकीच्या या वातावरणात एक नवा ट्विस्ट पाहायला मिळत आहे
आतापर्यत शांत भूमिकेत असलेले आणि जिरायती भागातील नेते अशी ओळख असलेले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि नागवडे कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस हे देखील या निवडणुकीच्या मैदानात उतरले असून त्यांनी देखील महाविकास आघाडीकडून विधानसभेची उमेदवारी मागितली आहे त्यामुळे आता या निवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे
बाबासाहेब भोस हे मागील दोन वर्ष्यापासून नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांच्यासोबत होते ते कारखान्याचे उपाध्यक्ष देखील आहेत त्यामुळे भोस हे विधानसभेला राजेंद्र नागवडे यांच्यासोबत राहतील असेच चित्र होते परंतु मागील काही दिवसांपासून नागवडे व भोस यांच्यात काहीसा राजकीय दुरावा निर्माण झाल्याचे पाहायला मिळते राजेंद्र नागवडे यांनी काही महिन्यांपूर्वी अजित पवार गट(राष्ट्रवादी काँग्रेस)पक्षात प्रवेश केला त्यानंतर मात्र भोस यांनी आपण शरद पवार यांच्यासोबतच राहणार असल्याची ठाम भूमिका घेत लोकसभा निवडणुकीत देखील महाविकास आघाडीसोबत राहून खासदार निलेश लंके यांचा प्रचार केला परंतु त्यावेळी लंके हे भोस यांचे जवळचे नातेवाईक असल्यामुळे ते त्यांच्यासोबत राहतील आणि विधानसभेला ते पुन्हा नागवडे यांच्यासोबत येतील असे वाटतं असतानाच भोस यांनी मात्र महाविकास आघाडीसोबतच राहण्याचा निर्णय घेतला आहे फक्त निर्णयच घेतला नाही तर त्यांनी महाविकास आघाडीकडून विधानसभा लढवण्याची तयारी सुद्धा सुरु केली असून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून अधिकृत रित्या उमेदवारीची मागणी केली आहे
*माजी आमदार राहुल जगताप यांच्यासह नागवडे कुटुंबाची डोकेदुखी वाढणार*
बाबासाहेब भोस यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना तालुक्यात मोठ्या प्रमाणात कामे केली त्यानंतरच्या काळातसुद्धा त्यांनी कार्यकर्त्यांशी व्यक्तिगत संपर्क ठेवला भोस यांच्या कार्यपद्धतीमुळे तालुक्यात त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे तसेच भोस यांनी या आधी विधानसभा निवडणूक लढवली त्यात त्यांनी भरघोस मते देखील मिळवली पण त्यांना यश मिळाले नाही भोस हे रयत शिक्षण संस्थेशी मागील अनेक वर्ष्यापासून निगडित आहेत शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यात ते अग्रेसर राहिले आहेत त्याचप्रमाणे पोलीस स्टेशन,महसूल किंवा इतर कोणत्याही कामांमध्ये ते लोकांच्या हाकेला धावून जातात त्यामुळे तालुक्यात त्यांची एक वेगळी ओळख आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भोस यांची भूमिका महत्वाची राहणार आहे त्यामुळे भोस विधानसभेला आपल्या सोबत राहतील अश्या भ्रमात राहुल जगताप व नागवडे कुटुंब असतानाच आता भोस यांनीच निवडणूक लढवण्याची तयारी सुरु केल्यामुळे आणि भोस हेच स्वतः इच्छुकांच्या यादीत आल्यामुळे नागवडे व जगताप यांची डोकेदुखी वाढणार हे मात्र निश्चित.
*वेळप्रसंगी कारखान्याच्या पदाचा राजीनामा देईल/बाबासाहेब भोस*
नागवडे कुटुंबाला विधानसभेला मदत करायची असे दोन वर्ष्यापूर्वी माझा निर्णय झाला होता नागवडे कारखान्याच्या कोणत्याही पदाची मला अपेक्षा नव्हती राजेंद्र नागवडे यांच्या आग्रहामुळे मी संचालक झालो परंतु मागील काही दिवसात राजेंद्र नागवडे यांनी आपल्याला विचारात न घेता काही राजकीय निर्णय घेतले अजित पवार गटात नागवडे यांनी प्रवेश केल्यामुळे माझी अडचण झाली
मी १९८१सालापासून रयत शिक्षण संस्थेशी निगडित आहे रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळे मला तिथं संधी मिळाली त्यामुळे मी खासदार शरद पवार यांच्यासोबतच राहणार आहे
मी महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे तशी मी शरद पवार यांच्याकडे उमेदवारीची मागणी केली आहे आपल्याला उमेदवारी मिळाली नाही तर आपण त्या वेळच्या परिस्थितीनुसार कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ असे देखील भोस यांनी प्रशासक न्यूज पोर्टल च्या प्रतिनिधीशी चर्चा करताना सांगितले
'हे'जेष्ठ नेते उतरणार निवडणुकीच्या मैदानात!या नेत्यांची डोकेदुखी वाढणार
Reviewed by Prashasak
on
ऑक्टोबर ०२, २०२४
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: