पीआय हप्ते गोळा करायला गेला असेल,मला ग्रामपंचायत सदस्य समजता का?श्रीगोंद्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उदासीनतेबाबत खासदारांचा संताप!


विशाल अ चव्हाण 
प्रशासक न्यूज,दि.१४ऑक्टोबर २०२४

खासदार निलेश लंके यांनी आज श्रीगोंदा पंचायत समिती सभागृहात शासकीय आढावा बैठक आयोजित केली होती त्या बैठकीला बेलवंडी पोलीस निरीक्षक,श्रीगोंदा पोलीस निरीक्षक आणि तहसीलदार हे अनुपस्थित होते त्यावरून खा.निलेश लंके चांगलेच भडकले पीआय बैठकीला आला नाही त्याला वेळ नसेल हप्ते गोळा करायला गेला असेल श्रीगोंदा तालुक्यात अवैध धंदे राजरोस चालू आहेत पण पोलीस कारवाई करत नाहीत याबाबत खा.लंके यांनी नाराजी व्यक्त करत श्रीगोंद्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उदासीनतेबाबत संताप व्यक्त करत बैठकीला गैरहजर असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेत दिले तसेच नागरिकांच्या प्रश्नांवरून विविध खात्यातील अधिकारी,कर्मचारी यांना चांगलेच फैलावर घेत कामात सुधारणा करण्यास सांगितले अनेक अधिकाऱ्यांनी खासदारांच्या प्रश्नाला उत्तर देताना मी नवीन आहे मी आताच चार्ज घेतलाय असे सांगत जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला त्यावर लंके यांनी श्रीगोंद्या पेक्षा आमची पारनेर ची जनता जागरूक आहे तिथले अधिकारी जर असे वागले तर मला तिथंल्या जनतेने हाकलून दिले असते असं म्हणत श्रीगोंद्यातील निष्क्रिय प्रशासन व्यवस्थेवर ताशेरे ओढले 

या बैठकीला महसूलचे प्रतिनिधी म्हणून नायब तहसीलदार उपस्थित होते खासदारांनी त्यांना वेगवेगळ्या योजना रेशनींग चे प्रश्न याबाबत विचारले असता त्यांनी मला काहीच माहित नसल्याचे सांगितले त्यावर लंके चांगलेच संतप्त झाले तुम्हाला काही माहिती नाहीतर तुम्ही इथं काय ओळख परेड करण्यासाठी आलेत का असा प्रश्न करत आढावा बैठकीचा अर्थ समजतो का तुम्हाला असे म्हणत त्यांना चांगलेच धारेवर धरले परंतु आढावा बैठकीत नायब तहसीलदारांनी मला काही माहित नाही असे सांगितल्यामुळे सर्वांनीच आश्चर्य व्यक्त करत खासदारांना असे उत्तर भेटत असेल तर सामान्य नागरिकांना काय वागणूक मिळणार असा प्रश्न यावेळी उपस्थित झाला

नगरपरिषदे बाबत वाचनालयातील अतिक्रमण,घनकचरा व्यवस्थापन,नागरिकांचा विरोध असताना सुरु झालेले अभ्यासिकेचे काम,कंत्राटी कामगारांचे रखडणारे वेतन याबाबत लोकांनी तक्रारी केल्या तसेच छत्रपती संभाजी महाराज चौक सुशोभीकरणाच्या रखडलेल्या कामाबाबत खा. लंके यांनी बैठकीतच निर्णय करत दोन दिवसात काम सुरु करण्यास सांगितले

पंचायत समिती विभागातील जिल्हा वार्षिक योजनेत फक्त २५कामे मंजूर का असे विचारत एवढ्या मोठ्या तालुक्यात एवढे कमी प्रस्ताव का तसेच गाय गोठ्याचे ५०टक्के प्रस्ताव अपात्र कसे होतायेत असा प्रश्न उपस्थित करत त्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली श्रीगोंदा तालुक्यातील रस्ते निकृष्ट दर्जाची होत असल्याबाबत लंके यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले कामाबाबत आमदारांच्या मुलाला भेटा असा सल्ला अधिकारी देतात यावरून टिळक भोस यांनी संताप व्यक्त केला

*या विभागाविरोधात लोकांची आगपाखड,पैसे घेतल्याचा जाहीर आरोप*

आज झालेल्या आढावा बैठकीत वीज मंडळ,पंचायत समिती,भूमीअभिलेख या विभातील अधिकारी व कर्मचारी विविध कामे करून घेण्यासाठी पैसे घेत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला त्याबाबत लंके यांनी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधत या प्रकरणात गंभीर्याने लक्ष घालण्यास सांगितले तसेच शेतकऱ्यांना त्रास देऊ नका नाहीतर नीलेश लंके कोण आहे याची ओळख करून द्यावी लागेल असा सज्जड दम कामात हलगर्जी पणा करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना त्यांनी दिला वनविभागाच्या वनपरीक्षेत्र अधिकारी दीपाली भगत या बैठकीला उपस्थित नसल्याबाबत त्यांनी भगत म्याडम यांना फोन करून विचारले असता त्यांनी आपल्याला बैठकीबाबत काहीच माहित नसल्याचे सांगितले त्यावर लंके यांनी संतप्त होत तुम्हाला वनविभागाच्या कामाबाबत माहिती नाही बैठकीला यायला वेळ नाही असे म्हणत या बाईवर कारवाई करा रे असे सांगितले तसेच जलजीवनचे भोसले नावाच्या अधिकाऱ्याबाबत नाराजी व्यक्त करत वरिष्ठांना त्यांच्यावर कारवाई करण्यास सांगितले

*मला ग्रामपंचायत सदस्य समजता काय*

आज झालेल्या आढावा बैठकीला प्रमुख विभागाचे अधिकारी गैरहजर होते आणि जे कर्मचारी उपस्थित होते त्यांना खासदार लंके यांच्या प्रश्नांना व्यवस्थित उत्तरे न देता आल्यामुळे खासदार निलेश लंके यांनी चांगलीच आगपाखड करत तुम्हाला आढावा बैठकीचे गंभीर्य नाही तुम्ही मला काय ग्रामपंचायत सदस्य समजता का असा संतप्त सवाल करत उपस्थित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरत श्रीगोंद्यातील प्रशासकीय विभागावर नाराजी व्यक्त केली

यावेळी लंके यांनी श्रीगोंदा जामखेड रस्त्याच्या रखडलेल्या कामावरून राष्ट्रीय महामार्गच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेत रखडलेली कामे मार्गी लावण्यास सांगितले

*राजेंद्र नागवडेंची उपस्थिती,जगतापांची एक्झिट*

आज झालेल्या आढावा बैठकीसाठी राजेंद्र नागवडे हे खासदार लंके यांच्या शेजारी बसून होते तर माजी आमदार राहुल जगताप हे मात्र बैठक सुरु झाल्यावर तिथून निघून गेले त्यामुळे नागवडेनी लंकेशी साधलेली जवळीक हा आज चर्चेचा विषय होता याबाबत राहुल जगताप यांना विचारले असता ही आढावा बैठक आहे त्यामुळे या बैठकीला कुणीपण उपस्थित राहू शकत मला काम असल्यामुळे मी बाहेर गेल्याचे सांगितले तर राजेंद्र नागवडे यांनी मला बैठकीला आमंत्रित केल्यामुळे मी उपस्थित असल्याचे सांगितले पण असे असले तरी आजच्या नागवडे यांच्या उपस्थितीवरून दाल मे जरूर कुछ काला हे असेच दिसून येत होते 

आजच्या आढावा बैठकीसाठी माजी आमदार राहुल जगताप,जेष्ठ नेते बाबासाहेब भोस,राजेंद्र नागवडे,घनश्याम शेलार,राजेंद्र म्हस्के,टिळक भोस,मनोहर पोटे,राजू गोरे,संजय लाकूडझोडे,हरिदास शिर्के यांच्यासह कार्यकर्ते,नागरिक हे उपस्थित होते
पीआय हप्ते गोळा करायला गेला असेल,मला ग्रामपंचायत सदस्य समजता का?श्रीगोंद्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उदासीनतेबाबत खासदारांचा संताप! पीआय हप्ते गोळा करायला गेला असेल,मला ग्रामपंचायत सदस्य समजता का?श्रीगोंद्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उदासीनतेबाबत खासदारांचा संताप! Reviewed by Prashasak on ऑक्टोबर १४, २०२४ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.