''कुणी किती पण आडवे येऊ द्या मी त्यांना एकटा बास" जगतापांचा एल्गार!


विशाल अ चव्हाण 
प्रशासक न्यूज,दि.१६ऑक्टोबर२०२४

गेल्यावर्षी पेक्षा यंदा होणारी विधानसभा निवडणूक अनेक कारणांमुळे वेगळी ठरत आहे त्यातले मुख्य कारण म्हणजे चालुवर्षी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी झालेली इच्छुकांची भाऊगर्दी त्यातून तिकीट मिळवण्यासाठी सुरु असेलला प्रत्येक नेत्यांचा संघर्ष
त्यातूनच सध्या श्रीगोंदा मतदारसंघात शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तुतारी हातात घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरण्यास अनेक जण इच्छुक आहेत त्यातच आपल्याला जरी उमेदवारी मिळाली नाही तरी चालेल पण राहुल जगताप यांना उमेदवारी भेटणार नाही यासाठी महाविकास आघाडीतूनच फिल्डिंग लावली जात आहे आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून माजी आमदार राहुल जगताप यांची उमेदवारी निश्चित मानली जात असली तरी त्यांना रोखण्यासाठी अनेक जण प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे

त्याच पार्श्वभूमीवर काल मंगळवारी सकाळी पिंपळगावपिसा येथे सावित्रीबाई फुले महाविद्यालयाच्या समोर माजी आमदार राहुल जगताप यांनी कार्यकर्त्यांचा स्नेहमेळावा आयोजित केला होता या मेळाव्यासाठी श्रीगोंदा आणि अहिल्यानगर तालुक्यातून कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना राहुल जगताप यांनी संयमी भाषण करत कुणाचाही नमोल्लख न करता शालजोडीतून त्यांचे राजकीय विरोधक नागवडे व आमदार पाचपुते यांचा चांगलाच समाचार घेतला काहींना आमदार होण्यासाठी आता बॅनर आणि फ्लेक्स लावावे लागत आहेत असे म्हणत त्यांनी नागवडे यांच्यावर टीकास्त्र सोडले तर काहींनी तालुक्यातील धरणांची उंची वाढवण्या ऐवजी स्वतःचीच उंची वाढवली असे म्हणत त्यांनी आमदार पाचपुते यांच्यावर टीका केली तसेच काहींनी आता मुद्दाम आडवा पाय घालायला सुरुवात केली आहे पण मी पाच वर्ष अभ्यास केल्यामुळे मी निवडणुकीत पास होणारा विद्यार्थी असल्याचे सांगत त्यांनी विरोधकांना टोला लगावला

*स्व.बापू आणि तात्यांची आवर्जून आठवण काढत भावनिक आवाहन*
राहुल जगताप यांनी काल घेतलेल्या स्नेहमेळाव्यात त्यांचे वडील स्व.कुंडलिक राव जगताप यांच्या सोबतच स्व. शिवाजीराव नागवडे यांचा नमोल्लेख वारंवार करत एका दगडात दोन पक्षी त्यांनी मारले मी या दोघांच्या विचारावर राजकारण करणारा कार्यकर्ता असल्याचे सांगत कार्यकर्त्यांना भावनिक साद घातली तर दुसरीकडे नागवडे कुटुंबं आपल्या विरोधात असले तरी मी बापूंच्या विचारांचा पाईक असल्याचे त्यांनी काल दाखवून दिले

*गडी एकटा निघाला*
लोकसभेला शरद पवार यांच्या सोबत राहिल्यामुळे कुकडी कारखान्याला १२०कोटी रुपयांचे कर्ज मिळाले नाही तसेच महाविकास आघाडीची साथ दिल्यामुळे आपल्यावर अनेक संकटे आली असे जगताप यांनी वारंवार सांगितले आणि आता सुद्धा शरद पवार यांच्याकडून जगताप यांना उमेदवारी देऊन एकनिष्ठतेचे फळ मिळणार असे चित्र असतानाच महाविकास आघाडीतूनच त्यांना रोखण्यासाठी फासे टाकले जात आहेत त्यामुळे आज त्यांच्यासोबत दुसऱ्या फळीतील नेते सोडता तालुक्यातील कुठलाही मोठा नेता नसला तरी आपण माघार घेणार नाही असे राहुल जगताप यांनी स्पष्ट केल्यामुळे गडी एकटा निघाला असे म्हणणे वावगे ठरणार नाही
काल झालेल्या मेळाव्यासाठी नागवडे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष केशव भाऊ मगर,दीपक भोसले,हरिदास शिर्के,टिळक भोस,अतुल लोखंडे,ऊत्तमराव डाके, जिजाबापू शिंदे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते





''कुणी किती पण आडवे येऊ द्या मी त्यांना एकटा बास" जगतापांचा एल्गार! ''कुणी किती पण आडवे येऊ द्या मी त्यांना एकटा बास" जगतापांचा एल्गार! Reviewed by Prashasak on ऑक्टोबर १६, २०२४ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.